Navneet Rana Vs MP.Balawant Wankhede : खा. बळवंत वानखेडे यांचे नवनीत राणांना कोणते प्रतिआव्हान?
विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मतदान आणि मतमोजणीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापराबाबत संशय व्यक्त करून ईव्हीएम घोटाळ्यातून भाजपने राज्यात सत्ता स्थापन करण्याचा आरोप होत आहे. ईव्हीएम घोटाळा आणि सत्ता स्थापनेवर मात्र अमरावतीत दोन राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याकडून पराभूत झालेल्या नवनीत राणा यांनी बळवंत वानखेडे यांनी बॅलेट पेपर वर मतदान आणि ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राजीनामा देण्याचे आव्हान केले, तर खासदार वानखेडे यांनी हे आव्हान आपण स्वीकारत असून राणाना त्यांनी प्रतिआव्हान दिले आहे. खासदार वानखेडे यांनी बॅलेटपेपरवर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक आयोगाकडून त्यांनी लेखी पत्र दिल्यास आपण ही निवडणूक पुन्हा लढू,असे प्रति आव्हान नवनीत राणा यांना दिले आहे.
काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीन वर कोणताच आक्षेप घेतला नाही,आता विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराजय झाल्याने ते ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात उगाच आरोप करीत आहेत.लोकसभा निवडणुक निकालानंतर महाविकास आघाडीसाठी सर्व बरोबर होते. त्यावेळी लोकशाही होती,आता निकाल त्यांच्याविरोधात आल्याने त्यांच्या मते लोकशाही धोक्यात आली,खर तर हा विरोधी पक्षांचा दुटप्पीपणा आहे,जर महाविकास आघाडीला ईव्हीएम वर शंका असेल तर आधी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी राजीनामा द्यावा,सोबतच बडनेरा चे आमदार रवी राणा (नवनीत राणा यांचे पती) हे देखील राजीनामा देतील असे आव्हान माजी खासदार नवनीत राणा यांनी खासदार वानखडे यांना केले होते.
काय दिले खा. वानखडे यांनी प्रतिआव्हान.
ईव्हीएम वादाबाबत सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोप दरम्यान माजी खासदार राणा यांच्या आव्हानासंदर्भात प्रसारमाध्यमांसोबत बोलताना
अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी म्हटले की,मी राजीनामा द्यावा आणि बॅलेटपेपरवर निवडणूक लढवाव्यात असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. मग निवडणूक आयोगाकडून त्यांनी मला लेखी पत्र द्यावं की,येणारी लोकसभेची पोटनिवडणूक ही बॅलेटपेपरवर होईल,असे या लेखी पत्रात नमूद असावं.मग नवनीत राणा म्हणाल्या,त्याप्रमाणे मी कधीही राजीनामा देवून अमरावती लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक लढण्यास तयार आहे.माझी फक्त एकच अट आहे की निवडणूक आयोगाकडून बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊ असं पत्र त्यांनी द्यावे.
याच मुद्द्यावर शरद पवार पोहोचले मारकडवाडी गावात.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते आता पर्यंत राज्यात विरोधी पक्षाकडून मतदान यंत्र संदर्भात वेळोवेळी संशय आणि ईव्हीएम मशीन संदर्भात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. याच दरम्यान माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरने मतदान घेण्याची निवेदन दिल्यानंतर निवडणूक यंत्रणेने ही मागणी फेटाळली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार हे रविवारी मारकडवाडी गावात पोहचले होते.या ठिकाणी त्यांनी गावकऱ्यांचे म्हणणे एकून घेवून मारकडवाडी गाव, ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपर संदर्भात होत असलेल्या चर्चासंदर्भात महत्त्वाचे भाष्य शरद पवार यांनी केले आहे.
अमेरिकेत मतमोजणीला अनेक दिवस लागत असली तर भारतात काय अडचण आहे.
भारतात लोकशाही असल्याने मतदान प्रक्रिया पूर्णतः पारदर्शी ठेवून मतदाराने टाकलेली मत कुठे गेले हे त्याला कळायला हवे.या संदर्भात केंद्रात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी ने राष्ट्रपती यांच्याकडे विनंती केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता झालेला 52 टक्के मतदान झाल्यानंतर 68% मतदानाची टक्केवारी कशी वाढली?यावर आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न केला,मात्र निवडणूक आयोग यावर काहीच बोलायला तयार नाही, असा आरोपही केंद्र आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून होत आहे.
अमेरिकेत मतमोजणीला जास्त दिवस लागतात, तर भारतात 64 कोटी मतांची 24 तासात मोजणी होते, हे जगात मोठे आश्चर्य आहे,असे नुकतेच अमेरिकेचे उद्योगपती एलन मस्क यांनी म्हटले होते.तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीन मतदान आणि मोजणीवर जोरदार आक्षेप नोंदविणे सुरू केले असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया व्हावी अशी मागणी लावून धरली आहे.