Nationalist Congress Party: मानोरा तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न.
Nationalist Congress Party प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचविण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली २५ डिसेंबर रोजी माहेश्वरी भवन मानोरा येथे तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी श्री.जयकीसन राठोड, माजी सभापती जि.प वाशिम,श्रीमती सोनालीताई ठाकूर,पक्ष निरीक्षक अमरावती, श्री.देवव्रत डहाके,युवा नेते,श्री.अशोक परळीकर, पक्ष निरीक्षक यवतमाळ,श्री.सुरेश पाटील गावंडे, जि.प सदस्य वाशिम,सौ सीमाताई सुरुशे राकापा महिला जिल्हाध्यक्ष वाशिम,श्री.अशोकराव देशमुख, मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा,श्री अशोक डोंगरदिवे सभापती जिप वाशिम,श्री प्रदीप देशमुख सभापती पस कारंजा,श्री प्रमोद पाटील लळे,वाशिम तालुकाध्यक्ष श्री सुनील पाटील अखंड.
रिसोड तालुकाध्यक्ष श्री अशोक जाधव,मालेगाव तालुकाध्यक्ष श्री सुशांत जाधव,श्री अमोल ठाकरे कारंजा तालुकाध्यक्ष, श्री संतोष ठाकरे मंगरूळपीर तालुकाध्यक्ष, श्रीआत्माराम सोमटकर जिल्हा सरचिटणीस,श्री रविंद्र घुले जिल्हा उपाध्यक्ष,श्री राजेश बाजड जिल्हा उपाध्यक्ष, श्री अजय श्रीवास शहराध्यक्ष कारंजा,डा अविष दरेकार, श्री मोहन भताने,सौ कविता राठोड राकापा महिला तालुकाध्यक्ष मानोरा,सौ कविताताई,कृउबा कारंजा संचालक श्री नितिन पाटील नेमाने,श्री भारत गुंजाटे, श्री देवेंद्र राऊत,श्री वीरेंद्र चारथळ.
पस सदस्य वसंतराव हळदे, श्री विश्वनाथ रोकडे,खविस संचालक खेमसिंग चव्हाण,श्री किशोर नाईक जिल्हा सहसचिव,श्री सुनील राठोड,अ नईम,श्री दिलीप चव्हाण जिल्हा संघटक तथा श्री गजानन पाटील बाजड आदी मंचकावर उपस्थित होते.यावेळी मा.अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य युवकांनी पक्ष प्रवेश केला,तसेच शिवसेना (उ.बा.ठा.)गटाच्या युवती मानोरा तालुकाध्यक्ष सौ माधुरीताई दीपक चतुर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आयोजित बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रसार,विस्तार व मा.अजितदादा पवार साहेब यांचे विचार घराघरात पोहचून घर तेथे राष्ट्रवादी संकल्पना यशस्वी करण्यासाठी विस्तृत चर्चा करण्यात आली,तालुकास्तरीय आढावा बैठकीला यशस्वी करण्यासाठी श्री राजेश पाटील नेमाने तालुकाध्यक्ष मानोरा,सचिव चंद्रकांत राठोड,शहराध्यक्ष मो सोहेल अन्सारी,राजा पटेल,इरफान शा यांचे सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले