नरसीत ऑटो ईलेकट्रीकल्स पार्ट दुकानास आग आठ लाखाचे नुकसान.

नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर

नरसी येथील गुडगिला पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या सुलतान ऑटो ईलकट्रीकल्स पार्ट दुकानाला २८ नोव्हेंबर च्या मध्यरात्रीनंतर शाॅक शर्टीकट होऊन दुकानाला आग लागली .रात्रीची वेळ असल्याने लवकर कळू शकले नसल्याने आगीने रौद्र रूप धारण केले .आग आटोक्यात आणण्यासाठी नायगाव येथील अग्निशमन दलास पाचरण करण्यात आले तो पर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले व यात आठ लाखाचे नुकसान झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

नरसी येथील फयुम गौसभाई शेख यांचे येथील पेट्रोल पंपाच्या बाजुला टिनपत्रात सुलतान ऑटो ईलेकट्रीकल्स पार्ट दुकान असुन दुकान मालक यांनी २७ रोजी सायकांळी ९ वाजता दुकान बंद करून घरी गेले .२८ रोजी साडे बारा वाजता दुकानात शाॅक शर्कीट होऊन दुकानातील साहित्याला आग लागली वेळ रात्रीची असल्याने आग लागल्याचे लवकर कुठले नाही .

आग रौद्र रूप धारण केल्यावर बाजूच्या एका दुकानदाराने पाहीले त्याच वेळी मोबाईल वरून संपर्क करून बोलून घेतले दुकान मालक फयुम व रामतीर्थ पोलिस कर्मचारी यांनी येऊन नायगाव नगर पंचायत च्या अग्निशमन दलास माहीती दिली .सदर गाडी येऊन आग आटोक्यात आणले पण दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले .यात आठ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले .

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.