नरसी शहरात लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी.

नरसी शहरात लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

नांदेड जिल्ह्यातील नायगाव( खै) तालुक्यातील मौजे नरसी हे गाव मध्यवर्ती ठिकाण व तिनं राज्य जोडणारा मोठा चौक म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील लहुजी साळवे नगरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या नंतर ध्वजारोहण नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पा.भिलवंडे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी सरचिटणीस तथा माजी पंचायत समिती सभापती श्रावण पा.भिलवंडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नरसी नगरीचे पोलिस पाटील इब्राहिम बेग पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे.

नायगाव तालुका शिवसेना प्रमुख (उ.बा.ठाकरे) रविंद्र पाटील भिलवंडे,नरसी चे विद्यमान सरपंच गजानन शिवाजीराव पा.भिलवंडे, माजी उपसरपंच मोहन पाटील भिलवंडे, प्रसिद्ध आडत व्यावसायिक बाबूराव पाटील शिंदे ,से.स.सो.चे मधुकर पाटील ताटे, माजी सरपंच एन.डी.नरसीकर , माजी मुख्याध्यापक नंदकिशोर टोकलवाड ,प्रकाश महाराज गिरी, ग्रामपंचायत सदस्य राजेश सूर्यवंशी, आदि मान्यवर उपस्थित होते.

लहुजी वस्ताद साळवे यांच्या जिवनचरीत्रावर प्रकाश टाकताना संभाजी पाटील भिलवंडे यांनी त्यांच्या कार्यप्रणाली, तरबेज क्रांतिकारक निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न, छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेले योगदान, राज्याप्रती , देशाभिमान आणि केलेल्या मौलिक त्यागाची जाणीव करून दिली.त्यासोबतच या सर्व महामानवानां आपापल्या जातीत अडकवून फार मोठी चूक करतो आहे त्यामुळे ते संबंध देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

त्यामुळे ते सर्वांचेच आहेत, तेव्हा प्रत्येक जण त्यांच्या विचारांना अंगीकृत कराल तेव्हा खरीखुरी जयंती साजरी केली आहे असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय समारोप करताना श्रावण पाटील भिलवंडे यांनी त्यांच्या महामानवांच्या विचारांनीच आपलीं तसेच समाजातील विविध घटकांची उन्नती होईल असे मत व्यक्त केले भविष्यात कोणत्याही प्रकारची कामे, अडचणी दूर करण्यासाठी सदैव तत्पर राहिन आशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मारोती सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन लालबा सुर्यवंशी यांनी केले या वेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार गंगाधर पाटील भिलवंडे, गोविंद टोकलवाड, लक्ष्मणराव बरगे , गंगाधर गंगासागरे, सय्यद आजिम नरसीकर, वरील सर्व पत्रकार नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरील जयंती सोहळा संपन्न कर‌ण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष कुडके, राहूल डूमणे, दिलीप सुर्यवंशी,आमोल झगडे, साहेबराव सुर्यवंशी, गंगाधर जाधव, नागोराव सोमवारे, देविदास सोमवारे यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one + eight =