नरसी शहरातील बसस्थानकात सि.सी. टि व्ही कॅमेरे बसविण्यात यावेत ऑल इंडिया तन्जिम ए इंसाफ शाखा नायगाव चे मागणी.
*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*
नायगाव तालुक्यातील नरसी येथे तन्जिम ए इंसाफ या सामाजिक संघटनांचे शाखा नायगाव तालुका पदाधिकारी कार्यकर्ते शेख आजम इस्माईल साब, यांच्या हस्ते दि. 31 ऑग 2023 रोजी सदर बस स्थानकात सि.सी. टिव्ही बसविण्यात यावेत अशी मागणी केली होती परंतु….. !! पुन्हा एकदा नव्याने निवेदन दिले या बाबत सविस्तर माहिती अशी की नरसी शहर हे नांदेड जिल्ह्यातील फार मोठा चौरस्ता म्हणून सुप्रसिद्ध आहे.
त्यातच तिनं राज्याच्या सीमेवर असलेल् मध्यवर्ती ठिकाण आहे त्यामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून अनेक प्रवासी येथील बसस्थानकातून आपापल्या गावी जाण्यासाठी हजारो प्रवासी येतात व त्याचबरोबर शाळकरी मुले , मुली आणि सवलतीचे जेष्ठ नागरिक वय वर्षे 75, व राज्य सरकारने महिलांच्या सन्मानार्थ दिलेल्या हाफ टिकिट मुळे व,वय वर्षे 60 ला पण हाफ अर्धे टिकीटाची सवलती देण्यात आल्या त्यामुळे सर्वसामान्य जनता सदरील सवलतीचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या बसने प्रवास करण्यासाठी तौबा गर्दी करतात.
तेव्हा त्यांना चोर, दागिने चोर, पाकिटमार, याच्या सह अनेक मुलींना, महिलांना छेड छाड अशा समस्यांना सामोरे जावे लागते आहे. यापूर्वी हि तन्जिम एक इंसाफ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित महामंडळाच्या अधिकारी व उपस्थित राहणारे वाहतूक नियंत्रक यांना निवेदन देवून सदरील बसस्थानकात सि.सी. टिव्ही कॅमेरा बसविण्यात यावेत.
अशी मागणी केली होती परंतु संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांनी त्या निवेदनाची कुणीही तसदी घेतली नाही प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची कोणालाही काळजी नाही हे स्पष्ट होते आसा सुर प्रवाशांमधून येत आहे तर मुलं, मुलींच्या पालकांनाही या तौबा गर्दी व चोर पाकिटमार यांचा चांगलाच धसका घेतला आहे. तरी संबंधितांनी यांची नोंद घेत त्वरीत सि.सी. टिव्ही कॅमेरा बसविण्यात यावेत अशी मागणी जनतेतूनही होत आहे.