नरसीत नैसर्गिक उपचार शिबिरास प्रतिसाद २५६ लाभार्थ्यांना घेतला लाभ.
*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*
राजस्थान येथील तज्ञा डॉक्टर जितेंद्र सिंह व प्रमोद कुमार यांच्या माध्यमातून विना औषध गोळ्या न घेता उपचार करताना आतापर्यंत २५६ लाभार्थ्यांना लाभ घेतला असून वयोवृद्ध लोकांनां तात्काळ उपचार दरम्यान दिलासा मिळत आहे. तर दोन तालुक्यातील वाढत्या गर्दी व प्रतिसाद पाहता नैसर्गिक उपचार शिबिराची कालावधी सात दिवासाहून १५ तारखीपर्यंत वाढविल्याची माहिती आयोजक शिवराज होटल्पा व मुकेश टाकळीकरांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना व वयोवृद्ध व्यक्तींच्या वाढत्या वयानुसार आरोग्यच्या समस्या यादृष्टी कोनातून शिवराज होटलप्पा यांच्या संकल्पनातून ऑक्युप्रेशर नैसर्गिक पद्धतीद्वारे साप्ताहिक उपचार शिबीराचे आयोजन केले होते. त्यामध्ये नैसर्गिक चिकित्सा पध्दतीद्वारे उपचार शिबिराच्या माध्यमातून लखवा मारने, गुडघे दुखी, पोटाचा विकार, हातापायात मुंग्या येणे.
बीपी, शुगर यासह विविध सर्व रोगाचे निदान विना गोळ्या औषध न घेता ऑक्युप्रेशर पध्दतीने उपचार ह्या शिबिरात गरजू रुग्ण उपचार घेऊन त्यांना दिलासा मिळत असल्याने होऊ घातलेल्या शिबिरास प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील नागरिकांनी तब्बल सात दिवस चालणारे नैसर्गिक शिबिर तब्बल पंधरा दिवस कालावधी वाढविल्यामुळे उपचार घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी मुकेश पाटील टाकळीकर,शिवराज होटलप्पा,राजेश भिलवंडे हे परिश्रम घेतले आहेत