नरसी येथे आज खंडोबा देवाची भव्य पालखी सोहळा व महाप्रसाद.
*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*
नरसी येथील भंडारा डोंगर येथे खंडोबा देवस्थान फार जुने आहे या देवस्थानचा असा पण एक इतिहास आहे, गेल्या अनेक वर्षापासून वर्षाचे बारा महिने दर रविवारी भाविक भक्ताकडून महाप्रसादाचे नियोजन केले जाते व खंडोबा देवाचा सट हा सण झाल्या दुसऱ्या दिवशी नरसी येथील जागृत देवस्थान भंडारा डोंगर खंडोबा देवाचा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो यंदा पंचविसावा वार्षिक महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे.
अशा या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांचे स्वागत करण्यासाठी नरसी चौकातील चारही मुख्य रस्त्यावर भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत, आज दि.19/12/2023 रोजी मंगळवारी नरसी जुने गावातील खंडोबा देवस्थानचे पुजारी श्री गणपती मल्हारी महाराज पाटे यांच्या निवासस्थानाहून मिरवणूकीत वाघे वारू लहान थोर महिला पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून खोबरे व भंडाराची उधळण करत खंडोबा देवाची पालखीची सुरुवात केली जाते.
ही पालखी नरसी जुन्या गावासह नरसी येथील मेन चौकाला प्रदक्षिणा करून खंडोबा मंदिराकडे प्रस्थान होते व तेथे सर्व वाघे वारू व भक्तासोबत महाआरती केली जाते आरती संपल्यानंतर लगेच महाप्रसाद कार्यक्रम चालू केला जातो, तसेच रात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संबंध जिल्ह्यातून आलेल्या वाघे मंडळीचा जागरणाचा कार्यक्रम असतो तसेच येणाऱ्या भाविक भक्तांचे गैरसोय होऊ नये.
या हेतूने, खंडोबा देवस्थान कमिटी अध्यक्ष माधवराव मेकाले, उपाध्यक्ष मारोतराव वडगावे ,सचिव हणमंतराव कोकणे, सहसचिव किशन खनपट्टे, व्यंकटराव कोकणे ,गंगाधर वडगावे, मारोतराव मांजरमे, दत्ता भरपूरे ,माधवराव वडजे ,दत्ता गागलेगावे, किशोर जानोरे, भास्कर कोकणे, रमेश वडगावे, श्यामसुंदर कोकणे मारोती दरेगावे पांडुरंग बागडे संभाजी खनपटे राम खनपटे माधव कोकणे, प्रकाश तुपेकर, हणमंत मिसे, संभाजी मेहत्रे, पांडुरंग शिरगिरे, भिमराव बडूरे, शंकर जाणोरे , सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे अवाहन श्री खंडोबा देवस्थान चे अध्यक्ष माधवराव मेकाले व नियोजन समितीने केले आहे.