नानीबाई घारफळ विद्यालयाचा उपक्रम.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
बाभुळगाव येथे महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन.
बाभुळगाव येथील नानिबाई बाबासाहेब घारफळकर विद्यालयाचे वतीने माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय एकात्मता सदरातील महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन हा अभिनव कार्यक्रम दि.9फेब्रुवारी बाभूळगाव येथील मुख्य इंदिरा चौकात सादर करण्यात आला. घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी व जिजाबाई यांचा जिवंत देखावा सह गावातून प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर एकात्मा जोपसण्यासाठी कार्य केलेल्या थोर महापुरुषांच्या वेषभूषा साकारून त्यांनी दिलेले संदेश पथ नाटकाद्वारे दाखविण्यात आला.त्यानंतर महाराष्ट्र दर्शना मध्ये सुरुवात मकरसंग्रात या सणांनी करण्यात आली. त्यानंतर पोळा, ईद,, गौरीपुजन वर्ष भर येणारे सणांची रेलचेल कशी असते हे प्रत्यक्ष सणांची वेशभूषा करून प्रमुख देखावे दाखविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता मालखुरे ह्या होत्या.
तर प्रमुख पाहुणे म्हणून ख.वि.संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे, न.पं.उपाध्यक्ष श्याम जगताप, कृउबा समितीचे उपसभापती रमेश माहनुर,सामाजिक कार्यकर्ता रिकपचंद जैन, माजी संचालक कृउबा प्रकाश छाजेड, नगरसेवक अनिकेत पोहोकार, मुख्याध्यापक दिनेश रामटेके,निखिल तातेड हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नानी बाई घारफळकर शाळेतील शिक्षिका व शिक्षक सारिका भगत, शितल शेंडे,भिसे, धूर्वे गजबे ,विघोट, कावलकर, बावणे,खान यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सारिका भगत यांनी तर आभार प्रदर्शन शितल शेंडे यांनी केले.