Nana Patole Amravati: काँग्रेस पक्षाचे ब्लॉक, बूथ कमिटी, प्रभाग मजबूत करा.

Nana Patole Amravati: काँग्रेस पक्षाचे ब्लॉक, बूथ कमिटी, प्रभाग मजबूत करा.

विभागीय बैठक : नाना पटोले यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र.

Amravati: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या सर्व ब्लॉक, प्रभाग आणि बूथ कमिटी अधिक मजबूत करून सक्रिय करा असा कानमंत्र प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांनी बुधवारी येथील काँग्रेस भवनात आयोजित विभागीय बैठकीत कार्यकर्त्यांना दिला. राज्यात विभागस्तरीय संघटनात्मक आढावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी सुरू केला आहे.

याअंतर्गत ११ ऑक्टोबर रोजी त्यांनी अमरावतीसह विभागातील जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली प्रारंभी जिल्ह्याचा आढावा घेतला. बैठकीला माजी पालकमंत्री आ यशोमती ठाकूर, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. बळवंत वानखडे, डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, नाना गावंडे, आ.डॉ. वजाहत मिर्झा आ. धीरज लिंगाडे, आ. अमित झनक, आ. राहुल बोंद्रे, हरिभाऊ मोहोड, शहर कॉंग्रेसचे बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश पदाधिकारी दिलीप एडतकर आदी उपस्थित होते.

त्यानंतर जिल्हानिहाय आढावा नाना पटोले यांनी घेतला. भाजपा सरकारने देशासह राज्यात हुकूमशाही चालविली आहे. खासगीकरण म्हणजे शिक्षित युवकांना चपराकच आहे. त्यामुळे यांचा बदला काढण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आल्याचे आ. यशोमती ठाकूर म्हणाल्यात. जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीची माहिती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढ्यात मांडली.

बैठकीला मिलिंद चिमोटे, अंजली ठाकरे, प्रकाश काळबांडे, संजय मार्डीकर, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, महेंद्र गैलवार, प्रदीप देशमुख, पंकज मोरे, जयंत देशमुख, प्रवीण मनोहर, दयाराम काळे, प्रमोद दाळू, श्रीकांत झोडपे, किशोर देशमुख, नामदेव तनपुरे, अरविंद लंगोटे, उत्कर्ष देशमुख, बिट्ट मंगरोळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 5 =