Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna Maharashtra : केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा आणि कृषी क्षेत्रात त्यांचे योगदान पाहता त्यांचा सन्मान व्हावा यासाठी पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची निधी दिली जात आहे.
आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पी एम किसान योजनेतून भारतातील शेतकरी सन्मान योजना चालविली जाते.
आता यात शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळणार. राज्य सरकारचे अनुदान मधून प्रती लाभार्थी शेतकरी वार्षिक 6 हजार रुपयांची या योजनेत वाढ होईल.यामुळे पीएम किसान योजनेत PM Kisan Yojana मधून आता शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांची वार्षिक मदत ही केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदान मधून देण्यात येणार आहे.एकूणच या नव्या नमो शेतकरी योजनेमुळे,आता महाराष्ट्रात शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ झालेली आहे.
अशी आहे पात्र लाभार्थ्यांसाठी योजना.
महाराष्ट्र सरकारकडून पी एम किसान योजनेसोबत जुळून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राबविण्यात येत असून,केंद्र सरकारच्या शेतकरी यादीनुसार महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकरी गृहीत धरण्यात येत आहे.
- महाराष्ट्रात लाभार्थी शेतकरी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले लाभार्थी असेल.
- केंद्र सरकारने शेतकरी लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकष बदलले आहे.केंद्राच्या या तात्काळ बदल परिणामामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे शेतकरी लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहे.
- या व्यतिरिक्त पी एम किसान पोर्टलवर सध्या नव्याने नोंदणी करणारे नवीन लाभार्थी शेतकरी, आणि यापूर्वी लाभ मिळालेले पात्र लाभार्थी शेतकरी सुद्धा या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
आणि आता राज्य सरकारच्या “नमो शेतकरी सन्मान निधी” मधून शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मदतीने विविध हप्त्यात एकूण 12 हजार रुपयांची वार्षिक मदत दिली जाईल.कारण यात आता राज्य सरकारच्या अनुदानातून प्रति लाभार्थी शेतकरी वार्षिक 6000 रुपयांची वाढ होणार आहे.ही वाढीव रक्कम राज्य सरकार शेतकऱ्यांना देत आहे.
यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता विविध तीनमाही हप्त्याने एकूण 12000 रुपयांची आर्थिक मदत विविध हप्त्यांमधून त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणाली द्वारे जमा होणार आहे.देशातील शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विविध योजना राबविल्या जातात.
त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रात पी एम किसान योजनेसोबत जोडून लागू करण्यात आली आहे.याला राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदान देईल.
ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब ठरताना दिसत आहे.केंद्र सरकारची किसान योजना महाराष्ट्रात राबविण्याची सुरुवात 2023 यावर्षी सुरु झाली होती 26 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्रातील शिर्डी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री किसान योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला होता.
मात्र ही योजना इतर अनेक शेतकरी योजनांची निगडित असल्याने थेट शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचत नसल्याचे महाराष्ट्र सरकारचे लक्षात आले.त्यामुळे आता मात्र नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी हे पीएम किसान योजनेच्या यादीतूनच ठरविले जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या या संलग्नित योजनेचा एकत्रित लाभ मिळणे सहज होणार आहे.