बारामतीत NaMo Rojgar Melava : मुख्यमंत्र्यांनी 25,000 लोकांना रोजगार देण्याचे दिले आश्वासन.

बारामतीत NaMo Rojgar Melava : मुख्यमंत्र्यांनी 25,000 लोकांना रोजगार देण्याचे दिले आश्वासन.

NaMo Rojgar Melava: 2024 या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती मध्ये संग्राम सुरू असताना 2 मार्च 2024 रोजी नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाला शरद पवार,अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित उपस्थिती पहावयास मिळाली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

शरद पवार अध्यक्ष विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मंचावर युवक युवती रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे देखील कार्यक्रमासाठी दाखल झाल्या होत्या. पाच जिल्ह्यातून युवक युवती या रोजगार मेळाव्यासाठी जमले होते.

नमो रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट:

बारामतीत नमो रोजगार मेळावा 2 मार्च ते 3 मार्च 2024 असा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात 43 हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर आणि तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.

अशा पद्धतीने मिळणार युवकांना रोजगार:

311 उद्योजकांच्या मदतीने विविध कंपन्यांचा आढावा घेऊन, मुलाखती घेऊन नियुक्तीपत्र देण्याचा कल आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. सुमारे 25000 युवक युतींना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले.

” कार्यक्रमासाठी जमलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे 25000 तरुण तरुणांच्या पात्रता आणि क्षमतेनुसार नोकऱ्या दिल्या जातील” “पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत 1.40 कोटींहून होऊन अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. नुकतेच दाबून स्विझर्लंड येथे राज्याने केलेल्या पाच लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावावर सह्या देखील करण्यात आल्या आहेत.”

“सरकार लोकांसाठी समर्पित भावनेने काम करत असून सरकारी, निमशासकीय, खाजगी, पोलीस दल आणि इतर विभागांसह सर्वच क्षेत्रात रोजगार निर्माण करीत आहे. मराठा समाजाला गेल्या महिन्यात १० टक्के आरक्षण जाहीर झाले आहे. रोजगाराच्या संधी सर्वानाच मिळतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मेळाव्या व्यतिरिक्त इतर उद्घाटन:

बारामती मेगा जॉब फेयर व्यतिरिक्त मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नवीन बस स्थानकाचे उद्घाटन आणि नवीन पोलीस वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. समोरच्या काळात लातूर, नागपूर आणि नगर या ठिकाणी देखील रोजगार मिळावा पार पाडण्याची शाश्वती मिळाली आहे.

रोजगार मेळावा की शक्ती प्रदर्शन?

येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती मध्ये खासदार सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची लढत आपल्याला बघावयास मिळणार आहे. मग रोजगार मेळावा हा युवा पिढीच्या हितासाठी की निवडणुकीकरिता शक्ती प्रदर्शनासाठी असा प्रश्न पडणे स्वाभाविक असून यात काही गौप्य नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 8 =