शरद चंद्र महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यशाळा संपन्न.
*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*
शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के हरि बाबू हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून देगलूर महाविद्यालय देगलूर येथील कार्यालयीन अधीक्षक श्री गोविंद जोशी हे होते गोविंद जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून जास्तीत जास्त कामे कसे करता येईल तसेच कार्यालयीन संगणीकरणाबद्दल सुद्धा सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांना कार्यालयात कोणत्याही कामासाठी त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे मत प्रतिपादन केले आपल्या मार्गदर्शनामध्ये कार्यालयीन . कर्मचारी नॅक ला कसे सामोरे जायचे याबद्दल ही माहिती त्यांनी दिली तसेच रजेच्या संदर्भातील त्यांनी सविस्तर माहिती दिली त्यानंतर उपस्थिती तांच्या प्रश्नांची समाधानी त्यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ .के . हरि बाबू यांनीही कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये उपलब्ध कर्मचाऱ्याकडून जास्तीत जास्त कामे करण्याची आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक IQAC चे समन्वयक प्राध्यापक डॉ. ए बी पांडे यांनी केले त्यांनी या कार्यशाळेचा आयोजनाची भूमिका मांडली सूत्रसंचालन संयोजक प्रोफेसर डॉ . श्रीरंग वट्टमवार यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रकाश हिवराळे यांनी मानले या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक प्रशांत बिलवणी कर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी तसेच नॅक चे समन्वयक प्रा .डॉ .वैभव कवडे प्रा. डॉ . महानंदा राऊत खेडकर इत्यादी उपस्थित होते.