मौजे हुस्सा येथील ग्रामपंचायतच्या निधीतून बोरवेल्स मारलेल्या पाण्याचा गैरवापर होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष.
*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*
नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील सन 2018 ते सन 2019 मधील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या निधीतून अंदाजीत नऊ ते दहा लाख रुपये निधी मिळून देखील गावाला पाणी मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे. हा निधी गावातील नागरिकांसाठी व त्यांना सोयीस्कर पाणी पुरवठा करण्याकरिता शासनाने हुस्सा गावकऱ्यांसाठी मोठा निधी प्राप्त करून दिला असून त्या निधीचा अक्षरशः गैरवापर होत आहे.
शासनाने दिलेल्या निधीच्या माध्यमातून एका खाजगी शेतकऱ्यांच्या शेतात गट क्रमांक 271 मध्ये बोरवेल्स मारले असून त्या बोरवेल्सला एकूण तीन इंची पाणी असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. पण त्या बोरवेल्सला पाणी असून देखील गावाला अध्यापही पाणी मिळालेले नाही याबाबतची माहिती पुढे आल्याचे दिसून येत आहे. सदर बोरवेल चे पाणी स्वच्छ व पिण्यासाठी पोषक असल्याने गावाला मोठ्या प्रमाणात फायदा होता मात्र त्या पानाचा गैरवापर करून ते पाणी शेतजमीनी भिजण्यायाकरता मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येत आहे.
सन 2018 ते 2019 पासून सातत्याने त्या पाण्याचा गैरवापर संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतजमिनी भिजविण्याकरता होत असून या पाण्याचा कुठलाच गावकऱ्यांना फायदा होताना दिसून येत नाही. गावातील दलित वस्तीमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना देखील पाणी दलित वस्ती ना मिळत नाही आणि गावातील एका बोरचे पाणी दलित समाजाला पुरवठा करत असून ते पाणी देखील दूषित असल्याचे सांगण्यात येत आहे व पाणी वेळेवर पाणी मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.दलित समाजातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दलित समाजातील अनेकांच्या घरी खाजगी बोरवेलच्याद्वारे विकत पाणी घेऊन जीवन जगत आहे.
मात्र शासनाने गावासाठी लाखो रुपयांचा निधी देऊन देखील गावातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याची खंत आता नागरिकाकडून होताना दिसून येत आहे. सदर बोरवेल्स हे तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांच्या संबंधित नातेवाईकांच्या शेतात असून त्या शेतकऱ्यांचे गट क्रमांक 271 आहे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून मारलेला बोर त्याची केवळ पाईपलाईन गावामध्ये आणल्याचे दिसून येत आहे पण मात्र त्या पाईपलाईन द्वारे एकदाही गावाला पाणी आलेला नाही.
ही पाईपलाईन नावालाच केल्याचे देखील सांगण्यात येत आहे. शासनाने अंदाजित दहा लाख रुपये निधी गावाला दिला असून पण त्या निधीचा मोठ्या प्रमाणात तत्कालीन सत्ताधारी यांनी गैरव्यवहार करून ते निधी अक्षरशः हडप केल्याचे देखील सांगण्यात येता आहे . याबाबतची माहिती तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांना विचारले असता त्यांच्याकडून गावातील नागरिकांना खोटी माहिती देऊन गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
सदर बोरवेल्स हे खाजगी शेतात का मारले असे विचारले असता तत्कालीन उपसरपंच व सरपंच यांनी ती जमीन ग्रामपंचायत च्या नावे केले असून व ते जमीन ग्रामपंचायत ने खरेदी करून त्या जमिनीमध्ये बोरवेल्स मारले आहे अशा पद्धतीची माहिती गावातील काही नागरिकांना प्राप्त करण्यात आले आहे मात्र तशा पद्धतीची नोंद अद्यापही ग्रामपंचायतच्या रजिस्टरवर दिसून आली नाही.
हे केवळ गावातील जनतेची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून शासनाच्या दिलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करून व तत्कालीन सरपंच व उपसरपंच आणि कॉन्ट्रॅक्टदार यांनी निधी हडप केल्याचे माहिती मिळताच श्री अशोक पांडुरंग वाघमारे यांनी सदर बोरवेल्स व पाईपलाईन ची माहिती घेऊन.व याबाबतची तक्रार संबंधित प्रशासन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय नांदेड यांना दिनांक 13- 12 -2023 रोजी निवेदन देण्यात आले होते.
त्यानंतर दिनांक 23- 1- 2024 रोजी गट विकास अधिकारी वर्ग एक नायगाव यांना देखील अर्ज देण्यात आले आहे. पण यावर कुठल्याच पद्धतीची चौकशी करण्यात आले नसल्याने सदर बोरवेल ची तक्रार संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नायगाव येथे दिनांक 15 -2 -2024 रोजी माननीय कार्यालयाला पत्र देऊन सदर बोरवेलची आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून त्वरित सदर बोरवेल्स ची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अन्यथा याबाबतची तक्रार वरिष्ठाकडे करून आमरण उपोषण व घागर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे.