नायगाव व नरसीत अवैध मुरुम व वाळु विक्री जोमात महसूल विभाग कोमात.
*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर*
नायगाव येथील महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम, वाळु विक्री नायगाव व नरसी शहरातील काही माफीयाकडुन राञंदिवस होत असताना महसूल मात्र मुग गिळून गप्प बसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तर दुसरी कडे अधिकारी आपले खिसे गरम करून घेत असल्याची जोरदार चर्चा जोर धरत आहे. शासनाचे मुरुम, वाळु चोरून उत्खनन करुन विकणारे लाखो रूपयेचा महसूल बुडवणा-या माफियाना व मदत करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.
नरसी व नायगाव शहरात मुरूम माफियांची एक टोळी महसूल विभागातील वरिष्ठ अधिका-याना हाताशी धरून मुरूम उत्खननाची कुठलीच परवानगी न घेता रात्रभर अवैध रित्या जेसीबी मशिनव्दारे मुरुमाचे उत्खनन करुन मोठ मोठ्य हायवा टिपरच्या माध्यमातून रात्रभर वाहतूक बिनधास्त केली जात असताना महसूल विभागातील अधिकारी कारवाई करण्यास हिम्मत दाखवत नाहीत.
मागील चार ते पाच महिन्यांपासून पासून हे उत्खनन बिनधास्त पणे महसूल अधिकार्यांच्या बळावर केले जात आहे. विशेष म्हणजे उत्खनन केलेला हजारो हायवा मुरुम महामार्गावरील रोडलगत चालु असलेल्या बांधकामांवर व शहरातील अनेक भागात चालु असलेले बांधकामास व मोकळ्या जागेत टाकला जात असताना महसूल खाते मात्र कोणी कितीही तक्रारी करा कुठलीच कार्यवाही केली जात नाही.
उलट सावध गिरीचा इशारा दिला जात असल्याने मुरुम माफीया आणी महसूल अधिकार्याचे संबध किति घट आहेत हे सिद्ध होते. जागो जागी होणारे वेअर हाऊस ,शाॅपीग काॅम्पलेक्स सह अन्य बाधकांमाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात अवैध मुरूमाचे व वाळूचे ढिग च्या ढीक असताना तलाठी कींवा मंडळधिकारी साधा पंचनामा ही करत नाहीत या वरुन यांचे असलेले साठे लोटे समोर येते. नायगाव नरसी शहरात राञंदिवस अवैध मुरुम उत्खनन होत आहे.
तालुक्यातील अनेक ठिकाणी कुठलीच परवानगी न घेता बेकायदेशीर उत्खनन करुन काढलेला मुरुम हायवा टिपरच्या माध्यमातून महामार्गावर जागो जागी टाकला जातो काही वेळात तो सपाट ही केला जात असताना या मार्गावरुन ये जा करणारे उप जिल्हाधिकारी, तहसीलदार सह अन्य अधिकारी मात्र याकडे डोळे झाक करुन जात असल्याने या माफीया सोबत त्यांचे असलेले साठे लोटे उघड होत असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वेळीच लक्ष घालून अवैध वाळु, मुरूम चोरी करणा-यावर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.