फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती साजरी.
*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजीम नरसीकर*
नायगाव तालुक्यातील नरसी येथे भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी करुनेचा महासागर माता रमाई आंबेडकर यांची 126 वी जयंती नरसी येथील मूकबधिर निवासी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून साजरी करण्यात आली. प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.
मूक बधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. स.पो.नी. श्रीधर जगताप अध्यक्ष भाषण करताना म्हणाले की माता रमाई चे आयुष्य हे संघर्षमय होते. महिलांनी माता रमाईचा आदर्श घ्यावा कारण बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी तिने शेन गौरी थापून लाकूड मोळी विकुन शिक्षणासाठी पैसे दिले.माता रमाई डॉ. बाबासाहेबांच्या जीवनात नसती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते झाले नसते.
यावेळी फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच प्रमुख भास्कर भेदेकर यांनी मनोगत व्यक्त करताना माता रमाईचा प्रसंग सांगताना म्हणाले की माता रमाई आंबेडकर यांची तब्येत खालावली असताना हवा पालट म्हणून धारवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र वराळे सर यांच्या घरी हवा पालट म्हणून राहण्यासाठी गेल्या माता रमाईने तेथील वराळे सर यांच्या निवासी वसतिगृहा मध्ये शासकीय अनुदान राशन हे वेळेवर न भेटल्याने दोन दिवसापासून येथील विद्यार्थी उपाशी होते.
हे माता रमाईला समजल्याने त्यांनी आपल्या डब्यात ठेवलेले दागिने विकून विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची जेवणाची वस्ती व्यवस्था केली. म्हणून माता रमाईंना करुनीचा महासागर म्हटले जाते असे ते म्हणाले. यावेळी फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचचे प्रदेश उपाध्यक्ष गौसभाई शेख ,इंद्रजीत डुमणे ,किरण इंगळे, सूर्यकांत भेदे, प्रकाश होनसांगडे, विकास सोंडारे, दीपक कांबळे, निळकंठ तरटे ,मुनेश्वर सोनकांबळे, मुस्तफा पटेल, उद्धव बोयळ,, किशोर वाघमारे, वाजिद शेख यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन इंद्रजीत डुमणे यांनी केले तर आभार प्रकाश होणसांगडे यांनी म्हणले.