Nagpur Violence : औरंगझेबाचा पुतळा जाळण्यासाठी बजरंगदलाच्या आंदोलनानंतर नागपूर भडकले !

Nagpur Violence : सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर संदर्भात राजकीय आणि सामाजिक स्तरावर वाद सुरू आहे.दरम्यान खुलताबाद येथील औरंगजेब बादशहाची कबर हटविण्याची मागणी करीत नागपूरमध्ये बजरंग दल आणि इतर  हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर नागपूरमध्ये  सोमवार 17 मार्च रोजी रात्री मोठ्या प्रमाणात हिंसाचार होताना दिसला.

सोमवारी दुपारी नागपुरात बजरंग दलाच्या आंदोलनानंतर रात्री महाल भागात जमावाकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि वाहनांना आग लावण्याच्या घटना घडल्या.यामुळे संपूर्ण नागपुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.यादरम्यान जमावाला पांगवितांना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जमावावर अश्रूधुर अस्त्रांचा वापर आणि लाठीचार्ज करण्यात आला.तर जमावाकडूनही पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या दरम्यान महाल आणि नागपूर शहरातील काही भागात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले.अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मध्य नागपुरात हिंसाचार झाला.या दरम्यान रात्री जमावाकडून अनेक घरे,वाहने आणि दवाखान्याची तोडफोड आणि आग लावण्याच्या घटना झाल्या.

Nagpur Violence : CM फडणवीस यांचे शांततेचे आव्हान

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री नागपूर शहरात घडत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरवासीयांना शांततेचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर पोलिसांना दिले.

दरम्यान नागपुरात तणावाची  परिस्थिती पाहता तेथे अतिरिक्त पोलीस आणि सुरक्षा दलांची कुमक पाचारण करण्यात आली होती. दरम्यान मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की,नागपूर शहरातील परिस्थिती सध्या शांत असल्याची माहिती दिली.

काल रात्री महाल भागात दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात हाणामारी आणि आग लावण्याच्या घटना घडल्या.काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण शहरात तणाव असून मंगळवारी  सकाळदरम्यान  तणावपूर्ण परिस्थिती होती.

आस्थेचे प्रतिक असलेले अरबी वाक्य लिहिलेली चादर जाळण्यात आल्याने जमावाकडून तोडफोड.

बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनाद्वारे सोमवारी नागपुरात महाल भागात औरंगजेब कबर विरोधात प्रदर्शन करीत असतानाच औरंगजेबाचा पुतळा जाळला या दरम्यान पुतळ्यासह मुस्लिम  धर्मीयांचे  आस्थेचे प्रतिक असलेले अरबी वाक्य लिहिलेली चादर जाळण्यात आली.यानंतर या संदर्भात माहिती पसरताच नागपुरात तणाव निर्माण होऊन महाल आणि इतर काही भागात जमावाकडून हिंसाचाराच्या घटना घडल्या असल्याचे बोलले जात आहे.

महाल परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान विहिंप आणि बजरंग दलाने औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर खोदत आणि पुतळा जाळताना मुस्लिमांचे आस्थेचे प्रतिक असलेले अरबी शब्द लिहिलेली चादर जाळून त्याची विटंबना करण्यात आली,ते जाळल्याने इस्लामचा अपमान झाला,वास्तविकरित्या औरंगजेबचा पुतळा आणि त्या चादरीवर लिहिलेल्या आस्थेच्या शब्दांचा काहीच संबंध नसताना जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आल्याचा आरोप करीत अल्पसंख्यांक समाजाकडून गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

पोलिसांनी 50 हून अधिक जणांना अटक केली.

रात्री झालेल्या हिंसाचारानंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी महाल आणि हंसापुरी परिसरातून 50 हून अधिक लोकांना अटक केली.दरम्यान पोलिसांनी नागपुरात संवेदनशील भागात सुरक्षा वाढवली आहे.सोमवारी रात्री 12 पासूनच ही संचारबंदी लागू करण्यात आली होती.

कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती.दरम्यान स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनुसार परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.  सोबतच क्विक रिस्पॉन्स टीम (QRT),दंगल नियंत्रण पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) तैनात करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eighteen − eight =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.