Nagpur-Pune Vande Bharat Express : देशात आधुनिक अशी वंदे भारत सेमी एक्सप्रेस ट्रेन विविध भागात सुरू केल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात रेल्वे कनेक्टिव्हिटी तीव्र गतीने जोडण्यासाठी भारतीय रेल्वे कडून प्रयत्न होत आहेयापूर्वी महाराष्ट्रात विविध शहरातून वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.मात्र नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई या मार्गावर रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या असतानाही रेल गाड्या संख्या फार कमी आहे.
त्यामुळे आता नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे.तीव्र गतीची वंदे भारत ट्रेन High Speed Train.नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई ट्रॅकवरून सुरू झाल्यास विदर्भातील लाखो प्रवाशांना स्वस्त आणि आरामदायी रेल्वे प्रवास सुलभ होईल.
नागपूर पासून पुणे आणि मुंबई साठी 2 वंदे भारत ट्रेन लवकरच धावणार?
वंदे भारत एक्स्प्रेस येत्या काही महिन्यांत नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई मार्गावर धावण्यास सुरुवात होणार आहे.मध्य रेल्वेचे नागपूरचे डीआरएम विनायक गर्ग यांनी यासंदर्भात नुकतेच प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला असल्याची माहिती दिली.
Central Railway Nagpur Division सध्या नागपूर येथून नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदूर आणि नागपूर ते भोपाळ हे तीन वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
मात्र पुणे ते मुंबई आणि पुणे नागपूर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू झाली नव्हती,त्यामुळे आता नागपूर पासून या पुणे आणि मुंबई या २ शहरांसाठी 2 वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे.
दोन्ही मार्गांवरून रेल्वेप्रवास करणाऱ्या प्रवाशांची खूप मोठी संख्या
विदर्भातून नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे या दोन्ही मार्गांवरून रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खूप मोठी संख्या असतानाही ट्रेन संख्या फार कमी आहे.त्यामुळे पुणे मुंबई जाण्यासाठी प्रवाशांना मजबुरीने मग तिकीट घेऊन खाजगी बसेस मध्ये प्रवास करावा लागतो.
रेल्वे प्रवाशांची ही गरज पाहता मध्य रेल्वे मंडळ Central Railway Nagpur Division नागपूर मुंबई पुणे साठी अजून किती ट्रेनची गरज आहे याची यादी तयार केली होती.
नागपूर मुंबई आणि पुणे नागपूर मार्गासाठी नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी वाढली होती, त्यानुसार आता वंदे भारत ट्रेन थेट नागपूर पुणे आणि नागपूर मुंबईसाठी सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रूट जोडावा असा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे.
नागपूर-मुंबईसाठी सध्या इतका वेळ लागतो.
- सध्या नागपूर-मुंबई प्रवासासाठी मेलला 16 तासांचा प्रवास अवधी लागतो.
- सुपरफास्ट ट्रेनमधून 12 ते 13 तास प्रवास होतो.
- दुरांतो एक्स्प्रेस 11 ते 12 तासांत नागपूरहून मुंबईला पोहोचते.
- नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि गरीब रथ एक्स्प्रेस नागपूरवरून आठवड्यातून फक्त तीन वेळा धावते.
- हमसफर एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा धावते.
- आझाद हिंद एक्स्प्रेस आणि हातिया-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि इतर गाड्यांमध्ये सणासुदी दरम्यान प्रवाशांची गर्दी वाढल्याने नागपूर स्टेशनवरून जास्त गाड्या नसल्याने नागरिकांना प्रवासासाठी संघर्ष करावा लागतो.
- नागपूर-मुंबई मार्गावर गोंदिया-मुंबई मार्गासाठी Vidarbha Express आणि नागपूर-मुंबई मार्गासाठी Sewagram Express असे फक्त दोनच रेलगाड्या आहेत, यात मोठ्या
प्रवासी संख्या असल्याने वेटिंग आणि कन्फर्मेशन समस्या असते.
नागपूर वरून पुणे मुंबई साठी वंदे भारत सुरू झाल्यास प्रवास कालावधी कमी होणार.
मध्य रेल्वे नागपूर मंडळांनी प्रवाशांची गरज आणि नागपूर पुणे आणि मुंबईसाठी लागणारा अधिक प्रवास कालावधी कमी करण्यासाठी आता पावले उचलली आहे यामुळेच आता रेल्वे बोर्डाकडे नागपूर वरून मुंबई पुणे साठी दोन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
लवकरच हे दोन सेमी एक्सप्रेस ट्रेन येथून सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूर वरून वंदे भारत जोडल्यामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा कालावधी आता 10 तासांवर आणि नागपूर ते पुणे रेल्वे प्रवास फक्त 3 तासांवर येईल.
Nagpur-Pune Vande Bharat Express ट्रेन प्रवासात हे मिळणार थांबे ?
नागपूर ते पुणे भारत सुरू झाल्यानंतर वर्धा, धामणगाव,अकोला,शेगाव,भुसावळ,जळगाव,चाळीसगाव मनमाड, दौंड स्टेशन वर वंदे भारतची काही मिनिटासाठी थांबे असेल Train stop दरम्यान मध्य रेल्वे नागपूर मंडळांने वंदे भारत ट्रेनच्या तिकीट आणि टाइम टेबल संदर्भात सध्या अधिकृत अधिकृत घोषणा केलेली नाही.
मात्र लवकरच वंदे भारत ट्रेन नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई सुरू झाल्यास,मोठ्या प्रमाणात रेल प्रवाशांना वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे, कारण वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन अधिक गतीची आणि आरामदायी असल्याने प्रवाशांना याचा खूप फायदा होऊ शकतो.