Nagpur Hit And Run : पहाटे वेगवान ऑडी कारने अनेक वाहनांना धडकली,भाजप प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांच्या मुलाच्या नावे आहे ऑडी कार.
भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत बावनकुळे यांच्या मुलाच्या नावे असलेल्या ऑडी या आलिशान कार ने नागपूर येथे अनेक वाहनांना टक्कर दिली आहे.नागपूर येथील सिताबर्डी पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी पहाटे ही ऑडी कार वेगाने चालवून अनेक वाहनांना टक्कर देण्याची घटना घडली.या घटनेनंतर सीताबर्डी पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त ऑडी कार आणि दोन युवकांना ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नांव रोहित चिंतनवार आणि अर्जुन हावरे दोन्ही राहणार नागपूर असे आहे.
या ऑडी कार ने सर्वात आधी सोनकांबळे नावाच्या जोरदार टक्कर दिली यानंतर एका बाईक सवाराला टक्कर देत टी पॉइंट जवळ पुन्हा एकदा पोलो कारला टक्कर दिली. हे संपूर्ण घटना या परिसरातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. या प्रकरणात ऑडी कार चालकासह इतर एक असे मिळून दोन लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार ही ऑडी कार महाराष्ट्राचे भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावे असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑडी कार चालविणाऱ्या युवकांनी दारू पिली होती का सूत्रांच्या माहितीनुसार ही आलिशान ऑडी कार चालविणाऱ्या युवकाने तसेच त्यात बसलेल्या इतर युवकांनी दारू पीली होती. त्यामुळे हे दुर्घटना घडली असा संशय वर्तविण्यात येत आहे.तर दुसरीकडे पोलिसांनी प्राथमिक तपास करताना दुर्घटनाग्रस्त ऑडी कारला ताब्यात घेत त्यात बसलेल्या युवकांनाही अटक केली आहेत.पोलिसांनी या दुर्घटनेनंतर ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांची तसेच ज्यांच्या वाहनांना या आलिशान कार ने टक्कर दिली त्या लोकांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.तसेच हा ड्रंक अँड ड्राईव्ह चा प्रकरण असू शकतो असा संशय घेत पोलिसांनी पकडलेल्या युवकांची अल्कोहल टेस्ट केली आहे,याची मेडिकल रिपोर्ट अद्याप मिळाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माझ्या मुलाच्या नावे आहे ऑडी कार -भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे.
याबाबत न्यूज एजन्सीला माहिती देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले की सदर ऑडी कार माझा मुलगा संकेतच्या नावावर आहे. नागपूर येथे त्यांच्या मुलाच्या ऑडी कार मुळे झालेल्या दुर्घटनेनंतर राजकीय विरोधक आक्रमक झाल्याच्या मुद्द्यावर बावनकुळे म्हणाले की विरोधकांचे ते काम आहे. मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे तपास करणे जरुरी आहे,आणि यात जे दोषी आहे त्यांच्याविरुद्ध प्रकरण दाखल करून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.