Nagpur 70 Lakh Fraud Case : नागपूर शहरात SBI च्या नावाने ग्राहक सेवा केंद्र उघडून त्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे पैसे हडपणाऱ्या आणि नागरिकांना विविध योजनेत गुंतवणुकी करवून आणि जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 70 लाख रुपयांनी गंडा घालणाऱ्या दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे,तर या प्रकरणात एक आरोपी फरार आहे.
या संदर्भात नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 या वर्षात आशिष यशवंत जोगे रा. जरीपटका याने परिसरात एसबीआय या नावाने ग्राहक सेवा केंद्र उघडले होते.या कामासाठी जोगे याला स्वप्निल संतोष लांजेवार आणि दत्ता पांचाळ हे दोन लोक सेवा केंद्र चालविण्यासाठी मदत करीत होते.{CSC Center}.
या सेवा केंद्राच्या नावावर त्यांनी विविध लोकांना आर्थिक गुंतवणूक करून लाभ मिळवून देण्याचे आमिष देत पैश्यांची गुंतवणूक करून घेतली.यानंतर त्यांनी अनेक लोकांना लाखो रुपयांचा फटका दिलेला आहे.
पैसे जमा झाल्याचे बनावट पावत्या देत होते.
मुदत ठेवीवर गुंतवणूकदारांना 10 टक्के नफा मिळेल,अशी आशा दाखवून जोगे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लोकांकडून लाखो रुपये जमा केले.पोलिसांच्या माहितीनुसार वर्ष 2019 ते फेब्रुवारी 2025 या दरम्यान या तिघांनी मिळून अनेक लोकांना बँकेत विविध योजनांमध्ये पैसे जास्त आर्थिक लाभ देण्याचा आमिष दाखवून 70 लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली.
हे आरोपी महिलांना आणि गुंतवणूकदारांना एसबीआयच्या त्यांच्या योजनेत पैसे जमा झाल्याचे बनावट पावत्या सुद्धा देत होते,हे सुद्धा पोलीस चौकशीत उघड झाले आहे.
लाडकी बहीण योजनेचा पैसा आपल्या बँक खात्यात वळवून घेतला.
उल्लेखनीय म्हणजे या एसबीआय ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून आशिष जोगे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लाडक्या बहीण योजनेत महिलांना मिळालेल्या पैशांवर सुद्धा डल्ला मारल्याचे चौकशीतून समोर आले आहे.यशवंत जोगे याने आपल्या सहकार्यांसोबत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ देण्याच्या बहाण्याने महिलांना आलेले पैसे स्वतःच्या बँक खात्यात वळवून घेतले.
लाडक्या बहिण योजनेसाठी महिलांनी त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रातून बँक कहते उघडले होते, आणि इतर लोकांनी आपला पैसा गुंतवणूक म्हणून त्यांच्याकडे जमा केला होता. त्यांना नंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे कळताच लोकांनी आपले पैसे परत मागायला सुरुवात केली,पण आशिष जोगे आणि त्याचे सहकारी पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होते.
दरम्यान या भामट्यांकडून आर्थिक फसवणूक झालेल्या संगीता कटोच वय 55 राहणार गुरुनानक नगर लष्करी बाग या महिलेने पाचपावली पोलीस स्टेशनला या प्रकरणी तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी प्रमुख आरोपी आशिष यशवंत जोगे याच्यासह दत्ता पांचाळ आणि स्वप्निल संतोष लांजेवार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी आशिष जोगे आणि दत्ता पांचाळ या दोघांना अटक केली असून स्वप्नील लांजेवार हा आरोपी सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Nagpur 70 Lakh Fraud Case : दीड कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आली समोर.
पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली असता यापैकी आरोपी असलेला आशिष जोगे याने एसबीआय ग्राहक सेवा केंद्रच्या नावाने महिलांना आणि गुंतवणूकदारांना आर्थिक फसवणूक करीत मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले. यानंतर गुंतवणूकदारांकडून पैसे परत मारण्याचा तगादा लावताच आरोपी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते.
यादरम्यान आशिष जोगे याने याच पैशांच्या आधारावर बँकेकडून मोठ्या प्रमाणात होम लोन घेतल्याची माहिती समोर आली आहे.या सर्व आर्थिक व्यवहारातून त्याने दीड कोटी रुपये खर्च केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे.दरम्यान पाचपावली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करताना या तिघांच्या आर्थिक जाळ्यात अटकून फसवणुकीचे शिकार झालेल्या लोकांना या तिघाविरोधात तक्रार दाखल करावी,असे आवाहन केलेले आहे.