Nagar Parishad Darwha : अखेर ती रक्कम न.प.ने केली तहसील कार्यालयाकडे जमा.

अखेर ती रक्कम न.प.ने केली तहसील कार्यालयाकडे जमा.

समनक जनता पार्टी प्रवक्ते भिमराव राठोड यांच्या तक्रारीची दखल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

दारव्हा : Nagar Parishad Darwha ने तहसील कार्यालयासमोरील विना सर्व्हे नंबर ची खुली जागा महसूल विभागाकडे कब्जेहक्काने टाऊन हॉल बांधकामाकरिता मागितली.जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जमीन मागणी प्रस्तावासंदर्भात तहसीलदार दारव्हा,उपविभागीय अधिकारी दारव्हा यांचेकडून अहवाल मागविला.तहसीलदार दारव्हा यांनी तलाठी दारव्हा यांचेकडून या जागेच्या सर्व्हे नंबर आणि क्षेत्रफळांच्या बाबतीचा माहीती अहवाल मागविला.तलाठी दारव्हा यांनी सदरील जागेला कुठलाही सर्व्हे नंबर नसल्याचा आणि सदरील जागा महसूल रेकॉर्डला नोंद नसल्याचा अहवाल सादर केला.

सदरील जागेचे दुय्यम निबंधक दारव्हा यांनी 86,66,422 रु.मूल्यांकन अहवाल सादर केला.जिल्हाधिकारी यांनी दिनांक 09/09/2022 रोजी या जागेबाबत आदेश पारित करून न.प.दारव्हा यांनी ही रक्कम शासकीय कोषागारात भरणा केल्यानंतरच महसूल विभागाने जागेचा ताबा देण्याबाबत आदेश पारित केला. मात्र न.प.ने हम करे सो कायदा असे म्हणत ही रक्कम न भरता या जागेवर बांधकाम सुरू केले.समनक जनता पार्टी चे प्रवक्ते भीमराव राठोड यांनी या बाबत तहसीलदार दारव्हा,

जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे तक्रार केली.श्री.राठोड यांच्या तक्रारीची दखल तहसीलदार दारव्हा यांनीन.प.दारव्हा यांचेशी पत्रव्यवहार करून प्रारंभी 10 लक्ष रु.भरून घेतले.अखेर उपविभागीय अधिकारी दारव्हा यांनी न.प.ला पत्रव्यवहार केले असता दारव्हा न.प.ने दिनांक 31/01/2024 रोजी अखेर उर्वरीत रक्कम 76 लाख रु.चलनद्वारे तहसील कार्यालयाकडे जमा केली.मात्र दारव्हा न.प.ने ही रक्कम व्याजासह न भरता मुद्दल स्वरूपात का भरली असा सवाल श्री.राठोड यांनी केला आहे.

भिमराव राठोड

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eleven − eleven =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.