Nafed Soyabean Online Purchasing Process : सध्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे मागील दोन खरीप हंगामात निघालेल्या सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेला आहे.तर दुसरीकडे सरकारी स्तरावर खरेदी होत असलेले सोयाबीन आणि कापसाला सुद्धा सध्या भाव मिळत नाहीये. मात्र शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन अशी खुशखबर समोर येत आहे.
राज्य सरकारची खरेदी संस्था असलेल्या नाफेडकडून महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीची सुरुवात करण्यात आली आहे. नाफेड सोयाबीन ला प्रतिक्विंटल 4892 रुपयांचे दराने खरेदी करीत आहे.यासाठी या खरेदी संस्थेने ऑनलाईन नोंदणी सुरू केलेली आहे.शेतकरी यात नोंदणी करून आपल्या सोयाबीनला 4290 रुपये प्रति क्विंटल भाव मिळवू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना नाफेडच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
राज्यात नाफेड सोयाबीन खरेदीला सुरुवात झाल्यानंतर,आता शेतकरी आपल्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा,यासाठी नाफेडच्या ऑनलाईन नोंदणीसाठी समोर आलेले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री नाफेडला करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया नेमकी कशी आहे? आणि आपला सोयाबीन नाफेडला विकण्यासाठी काय करावे लागेल हे आपण जाणून घेऊ या….
नाफेड द्वारे सोयाबीनला मिळत आहे सर्वाधिक भाव.
महाराष्ट्रात गेल्या दोन खरीप हंगामात बंपर सोयाबीन उत्पादन झाल्यानंतरही शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला नाहीये. 2024-25 या खरीप हंगामातही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केल्यामुळे आता पुन्हा चांगला उत्पादन झाला आहे. तरीही राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनला फक्त 4100 ते 4400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे, तर दुसरीकडे सोयाबीन उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागल्याने उत्पन्न खर्च अधिक नफा हा सूत्र सध्या विस्कटलेला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सोयाबीन चा भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र तसे होताना दिसत नाही.सध्या सोयाबीन खाद्य तेलाचे भाव खूप वाढले आहे, मात्र खुल्या बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही,त्यामुळे सोयाबीन व्यापाऱ्यांना फायदा तर शेतकऱ्यांना नुकसान होत असल्याचे दिसत आहे.
खाजगी व्यापाऱ्यांकडून कमी भावाने सोयाबीनचे खरेदी होत असल्याने आता शासकीय खरेदी संस्थांवर शेतकरी निर्भर आहे,त्यामुळे नाफेड कडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळावा,यासाठी वाढीव दर देण्यात येत आहे.त्यामुळे आता शेतकरी नाफेड कडे वाढताना दिसत आहे आणि यासाठीच नाफेडकडून ऑनलाईन नोंदणीतून शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे.
सहज सोपी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया.
सध्या बाजारात सोयाबीनला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी नुकसान होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्री न करता घराचा त्याला ठेवला आहे.आता नाफेडने सोयाबीनला साडेचार हजार पेक्षा जास्त दर देण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना प्रत्येक प्रतिक्विंटल 4892 दर मिळणार आहे.
सोयाबीन खरेदी विक्री प्रक्रिया खूप जटिल असते,असा अनेक शेतकऱ्यांचा समज झालेला आहे,मात्र, ही खूप सोपी प्रक्रिया असून नाफेडच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताच, दिलेल्या मोबाईल नंबर वर लगेच नाफेड कडून संदेश मिळणार आहे,तो मिळताच शेतकरी आपला सोयाबीन नाफेड केंद्रावर खरेदीसाठी नेवु शकतात.खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांना बैंक खात्यातून पैसे मिळेल. तर जाणून घेऊया ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया.
नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी Nafed Soyabean Registration ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अगदी सोपी आहे.ते जाणून घ्या!
- नाफेडला सोयाबीन विकण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना ई समृद्धी E-Samriddhi (Website : esamridhi.in )या वेबसाईटवर जावे लागेल.
- वेबसाईटवर नोंदणी (Ragistretion) ऑप्शन वर क्लिक करताच या पर्यायासाठी आपला मोबाईल नंबर नमूद करावा लागेल.
- मोबाईल नंबर दिल्यानंतर स्क्रीनवर कॅपच्या कोड (CAPTCHA CODE) येईल, हा कोड दिलेल्या अल्फाबेटिक आणि नंबरीक फॉरमॅटमध्ये (Alfanumeric)तेथेच नमूद करावा लागेल.
- यानंतर मागितलेले मोबाईल नंबर आणि आलेला Capatcha code नमूद केल्यावर मोबाईल नंबर वर एक ओटीपी OTP नंबर येईल. हा नमूद केल्यावर लॉगिन होईल.
- लॉगिन झाल्यावर नाफेडच्या या वेबसाईटवर दिलेले प्रोसेस पूर्ण करून सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करावी लागेल. यात सोयाबीन विकणारे शेतकऱ्याची माहिती त्याचा बँक खात्याचा तपशील आणि शेती संबंधात विचारण्यात आलेली इतर तपशील नमूद करावे लागेल.
सोयाबीन विकल्यानंतर असे मिळेल पैसे.
शेतकऱ्यांनी नाफेड ला ऑनलाइन नोंदणी करून सोयाबीन विकल्यानंतर ज्या नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन विकली त्या ठिकाणी शेतकऱ्याला खरेदीची पावती दिली जाते यात त्या शेतकऱ्यांच्या मालाचा आणि त्याचा पूर्ण तपशील असतो.
नाफेडच्या खरेदी केंद्रातून मिळणाऱ्या पावतीत त्या शेतकऱ्याची सोयाबीनची किती पोती होती, सोयाबीनचे एकूण वजन, एकूण किंमत याची संपूर्ण माहिती त्या पावतीवर नोंद असते. बँक खात्यात एकूण रक्कम जमा होण्यासाठी किती वेळ लागेल,याची माहिती सुद्धा खरेदी केंद्रातून दिली जाते. केंद्रावर सोयाबीनची विक्री होतास नोंदणी कृषी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्याने विकलेल्या सोयाबीनचे पैसे जमा केले जाते.
बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी किमान 10 ते 20 दिवसांचा अवधी लागतो. मात्र नाफेडच्या या ऑनलाइन नोंदणीतून शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन विकला तर त्याचा वाढीव भाव मिळण्याचा फायदा होत आहे. सोयाबीन विकल्यानंतर नाफेड खरेदी लॉटनुसार पैशांची अदायगी करते.
ऑनलाइन नोंदणीसाठी लागतात ही कागदपत्रे.
नाफेड ला ऑनलाईन नोंदणी करून सोयाबीन विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करताना त्यांच्या कागदांची माहिती द्यावी लागते. त्याप्रमाणे
- शेतकऱ्याच्या जमिनीचा सातबारा
- नमुना 8 अ
- शेतकऱ्याचा आधार कार्ड
- त्याच्या बँक खात्याचा पासबुक
- सुरू असलेला मोबाईल नंबर.
हे कागदपत्रे ऑनलाईन नोंदणी करताना स्कॅन करून अपलोड करावी लागते. यावेळी नमूद करण्यात आलेल्या मोबाईल नंबर वर लगेच ओटीपी येऊन लॉगिन होते. यानंतर नाफेड सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना एक संदेश पाठविते.या नंतर नाफेड खरेदी केंद्रातून शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी होते.पोती आणि सोयाबीनचे योग्य वजन करून विकलेल्या सोयाबीनची नाफेड च्या किमती प्रमाणे विकलेल्या सोयाबीनची किंमत आणि एकूण रकम नमूद करून,त्याची अधिकृत पावती दिली जाते.