Muslims Role in Chatrapati Shivaji Maharaj Kingdom : सध्या महाराष्ट्रात ऐतिहासिक घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर छावा चित्रपट खूप चर्चेत आहे.देशात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले मराठा स्वराज यांनी त्याच्या इतिहासाबाबत चर्चा होत असताना महाराष्ट्रात मराठा स्वराज्यात आपला राज चालविताना छत्रपती शिवाजी महाराज यांची सैन्य आणि प्रशासना रचना खूप चर्चेत आहे.{Chatrapati Shivaji Maharaj }
जातीधर्मला दूर ठेवून 350 वर्षांपूर्वी ते आजतागायत रयतेच्या मनात आदराचे स्थान असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तसेच विविध सामाजिक धार्मिक संघटनांच्या माध्यमाने राजकारण होत आहे.
मराठा स्वराज्य चालविताना शेकडो वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी मुगल आणि इतर आक्रातांच्या विरोधात लढताना आपल्या राज्यात सर्वधर्मसमभाव राखला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात नव्हताच, तर रयतेच्या राज्यासाठी आणि मुघल साम्राज्याविरुद्ध ते संघर्ष करीत होते.पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित ही एक महत्त्वाची बाजू आहे.
तर दुसरीकडे या ऐतिहासिक वस्तुस्थितीला काही वर्ग विशेष विरोध सुद्धा करतात.अशातच महाराष्ट्रात सध्या महायुतीच्या सरकारात मंत्री असलेले नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात कोणीही मुस्लिम सैनिक नव्हते असे भाष्य करीत सामाजिक एकोपा बिघडविण्याचे आणि चिथावणी देण्याचे काम केले आहे.
तर दुसरीकडे महायुतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करून राजकीय स्तरावर फटकार त्यांना लगावली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे वक्तव्य कदापि सहन केले जाऊ शकत नाही असे म्हटलेले आहे.
मात्र मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक काळात स्वराज्य चालविताना त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक,तोपखान्याचे प्रमुख, आणि प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे मुस्लिम असल्याचे ऐतिहासिक आलेख आणि वस्तुस्थिती असतानाही विपर्यास असा वक्तव्य केलेला आहे.
त्यामुळे आता असा प्रश्न विचारला जात आहे की मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात खरोखरच एकही मुस्लिम नव्हता का?मंत्री राणे यांनी त्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम संदर्भात जे सांगितले आहे ते खरं आहे का? की त्यांनी ऐतिहासिक तत्त्वे जाणून न घेता हे वक्तव्य केले आहे का? त्यांच्या वक्तव्याला अजित पवार यांनी विरोध करताना जे सांगितले त्यात सत्य आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता ऐतिहासिक स्थिती खंगडताना चॅट जीपीटीची सुद्धा मदत घेतली जात आहे.{AI Chat GPT On History}
Muslims Role in Chatrapati Shivaji Maharaj Kingdom : ऐतिहासिक संदर्भात सविस्तर उत्तरे समोर आली.
नुकतेच AI आधारित ChattGPT ला विचारण्यात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात खरोखर एकही मुस्लिम नव्हता का यावर या प्रणालीने सविस्तर असे उत्तर दिलेले आहे.
- त्यामुळे आता आपण जाणून घेऊया की मंत्री नितेश राणे यांच्या दाव्यामध्ये तथ्य आहे किंवा नाही.
- या प्रणाली अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक काळात सैन्यात मुस्लिम होते किंवा नाही या संदर्भात सविस्तर उत्तरे आली आहेत.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्यांचा समावेश होता.
- मराठा साम्राज्य संचालित करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्मांचा आदर केला.
- त्यांच्या सैन्यात फक्त पात्र लोकांना स्थान देण्यात आले होते,मग ते कोणत्याही धर्माचे असोत.
AI आधारित ChattGPT द्वारे या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याबद्दल आणि प्रशासन रचनेबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनात आणि सैन्य रचनेत अनेक मुस्लिम सरदार आणि फौजेमध्ये सैनिकांना महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.त्यात ऐतिहासिक स्तरावर अनेक नावे खूप प्रसिद्ध आहेत.
- सिद्दी इब्राहिम- शिवाजी महाराजांच्या लष्करात मुख्य मुस्लिम योद्धा.शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख म्हणून सिद्दी इब्राहिम हे कार्यरत होते.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्करामध्ये तोफखाना प्रमुख म्हणून अनेक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
- दौलत खान- शिवाजी महाराजांच्या लष्करात राहून अनेक मोहिमांमध्ये सामील.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लष्करात दौलत खान हे मुस्लिम योद्धे होते.त्यांनी शिवाजी महाराज यांच्या वतीने राबविण्यात आलेले अनेक युद्ध मोहिमेमध्ये भाग घेऊन उत्कृष्ट युद्ध प्रदर्शन केले.
- सिकंदर- छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू अधिकारी.शिवाजी महाराजांच्या प्रशासनात सिकंदर नावाचा हा मुस्लिम अधिकारी त्यांचा खूप विश्वासू अधिकारी असल्याचा ऐतिहासिक पुरावा सुद्धा आहे.त्याला शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्यातील किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली होती.
- मुस्लीम मावळे- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात जो लष्कर होता त्यात सैन्य म्हणून मोठ्या प्रमाणात मुस्लिम मावळे मावळे होते.
हे मुस्लिम सैनिक गनिमी काव्याचा महत्त्वाचा भाग होते,या लष्कर मध्ये हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही धर्मांचे सैनिक समाविष्ट होते.
उल्लेखनीय म्हणजे देशात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कार्यकाळात त्यांनी राज्य चालविताना धार्मिक स्थरावर सहिष्णुता पाळली ते प्रत्येक धर्माचा आदर करीत होते.
कोणत्याही धर्मांचा ते विरोध करीत नव्हते आपल्या साम्राज्यात त्यांनी इस्लामचा नव्हे तर मुघलांचा विरोध करीत यांचे विरुद्ध संघर्ष केला.छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मंदिर आणि मशिद मध्ये फरक केला नाही.
आपल्या लष्करात भरती करताना त्यांनी कधीही हिंदू मुस्लिम आधारावर सैन्य भरती केली नाही.शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम युद्धांचा समावेश होता हे स्पष्ट आहे.एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना केली त्यात मुस्लिम मावळे आणि योद्धांचे योगदान आहे.
धार्मिक सहिष्णुता
छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा राज कायम केला होता.शिवाजी महाराज यांनी कोणत्याही धर्माचा विरोध केला नाही.त्यांनी फक्त देशात मुघल अत्याचारांविरुद्ध लढा उभारला.
शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारे नव्हे तर गुणवत्तेच्या आधारावर आपल्या लष्करात अधिकारी आणि सैन्यांची नियुक्ती प्रक्रिया राबविली.सोबतच त्यांनी आणि त्यांच्या सैन्याने आपल्या साम्राज्यात कोणत्याही भागात गेल्यावर तेथील मशिदी दर्गा आणि इतर कोणत्याही धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचविले नाही.असे ऐतिहासिक पार्श्वभूमीवर AI ChatGPT ने उत्तरे दिली आहे.आणि राज्यात या संदर्भात ऐतिहासिक आलेख सुद्धा आहेत.