महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे खडकी सदार येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे खडकी सदार येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते*

रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथे दिनांक 6 /12 /2023 बुधवार रोजी भव्य आरोग्य सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुंडलिक नगर देगाव यांच्यातर्फे आरोग्य शिबीर घेण्यात आले रिसोड तालुक्यांमध्ये आयुर्वेदिक कॉलेज तर्फे दरवर्षी आरोग्य शिबिर मिळावे घेण्यात येतात त्याप्रमाणे यावर्षी आरोग्य तपासणी शिबिर ग्रामपंचायत कार्यालय खडकी सदार येथे घेण्यात आले या शिबिरा मध्ये गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरामध्ये जवळपास 180 ते 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली व या रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली या शिबिरामध्ये डोळ्याची तपासणी करून मोफत आय ड्रॉप व मल्टी विटामिन च्या गोळ्या देण्यात आल्या तसेच मोतीबिंदू ऑपरेशन साठी जवळपास दहा ते पंधरा रुग्ण आढळले या रुग्णांना आयुर्वेद कॉलेज देगाव येथे मार्गदर्शन करून ऑपरेशन साठी बोलविण्यात आले.

तसेच लहान मुलांची तपासणी करून अँटिबायोटिक्स औषधे खोकला औषधे तापाची औषधे व जनरल पेशंटची तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले या शिबिरामध्ये आयुर्वेद कॉलेजचे डॉ निलेश गोरे ,डॉ अरु मॅडम ,डॉढोणे मॅडम ,डॉ पांडे मॅडम ,यांनी रुग्णांची तपासणी केली तर बीएएमएस इंटरशिप डॉक्टर प्रिया सोनुने ,कोमल जाधव, ऋतुजा गायकवाड, पल्लवी सुरूशे, संजना मोरे ,श्याम वाघ, राजेश गीते ,तसेच आयुर्वेद कॉलेजचे कर्मचारी उपस्थित होते.

या शिबिराचे आयोजन डॉ विलास सदार यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच सरला ताई सदार ,आत्माराम जी सदार ,उपसरपंच अशोक धांडे, शंकर मामा सुरोशे ,बाबारावजी गायकवाड ,शाळा समिती अध्यक्ष गजानन सदार ,नितीन सदार, तसेच गावातील जेष्ठ डी के सदार, सुभाषराव सदार ,विठ्ठलजी सदार, विलास धांडे, सोपान धांडे, कैलास सदार ,आदी गावातील नागरिक उपस्थित होते तर गावातील नागरिकांनी आयुर्वेद कॉलेज देगावचे आभार मानले तसेच रिसोड तालुक्यातील बाकी गावांमध्ये सुद्धा लवकरच शिबिराचे आयोजन करण्यात येईल असे डॉक्टर निलेश गोरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − 9 =