मुलाकडून कुऱ्हाडीने आईची हत्या. वडील जखमी.

**प्रमोद खिरटकर : चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी**

मुलाकडून कुऱ्हाडीने आईची हत्या. वडील जखमी.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

कोरपना तालुक्यातील लोणी येथील एका मुलाने आपल्या वयोवृद्ध आई वडिलाला एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास घडली आहे.यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहे.उपचारासाठी वडीलाला कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक आहे.सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर फरार आरोपीला अटक करण्यात आल्याचे कळते.

मनोज पांडूरंग सातपुते वयवर्ष अंदाजे 45, असे आरोपी मुलाचे नाव असल्याचे कळते. शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशातून यांच्यात हा वाद झाला आणि या वादातून सदर घटना घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.आरोपी मुलांने एका खोलीत आई आणि वडीलाला बंद केले आणि अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने 4 आणि हातावर 2 वार करून आईला जागीच ठार केला तर वडीलाच्या डोक्यावर 2 वार करून त्याला गंभीर जखमी करून वहीनीच्या मागे धावला.

मात्र ती एका खोलीत लपवून अंदरून दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला.घटनेनंतर आरोपी मुलाने तेथुन पळ काढला मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. आहे.पुढील कारवाई कोरपना पोलीस करीत आहे. पुढे काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

fifteen + 15 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.