Mukhyamantri Yojanadoot : मुख्यमंत्री योजनादूत भरती,50,000 जागा , असे करा ऑनलाईन अर्ज.

Mukhyamantri Yojanadoot : मुख्यमंत्री योजनादूत भरती,50,000 जागा , असे करा ऑनलाईन अर्ज.

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी यासाठी नुकतेच  “,मुख्यमंत्री योजनादूत” उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हे योजनादूत राज्यात ग्रामीण व शहरी भागात नागरिकांच्या घरी पोहोचून त्यांना योजनांची माहिती देतील.शासनाकडून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पदवीधर असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

गावात 1 तर शहरी भागात 5 हजार जनसंख्येमागे 1 योजनादुत नियुक्त होणार.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम चालणार असून यात. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक असे मिळून संपूर्ण राज्यात एकूण 50 हजार योजनादूत निवड 6 महिन्यांसाठी केली जाणार आहे.शासनाकडून या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत ग्रामीण,शहरी भागात शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची नागरिकांना माहिती देतील.

पदवीधर असेल सगळे योजनादुत.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार हा 18 ते 35 वयोगटातील कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक करण्यात आले आहे, तसेच उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अपडेट मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक असेल.

येथे करावा लागेल योजनादुत बनण्यासाठी अर्ज.

येणाऱ्या 13 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज,आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 × 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.