वैद्यकीय खर्चासाठी “Mukhyamantri Sahayata Nidhi” अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी!

Mukhyamantri Sahayata Nidhi : महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी “मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी” हा खरोखरच एक वरदान ठरत आहे.या योजनेअंतर्गत आतापर्यंत हजारो रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत मिळाली असून, त्यांचे प्राण वाचले आहेत.

या मदतीसाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि प्रक्रिया काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

पूर्वी या योजने अंतर्गत मदतीसाठी थेट मंत्रालयात जावे लागे, मात्र आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष” कार्यरत झाले आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावरच अर्ज करून मदत मिळवणे शक्य झाले आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

1. विहीत नमुन्यात भरलेला अर्ज

2. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचे प्रमाणपत्र (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जनकडून प्रमाणित)

3. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न ₹1.60 लाखांपेक्षा कमी असावे)

4. रुग्णाचे व महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे आधारकार्ड

5. रेशनकार्ड

6. आजाराचे वैद्यकीय अहवाल (एक्स-रे, MRI, ब्लड रिपोर्ट्स इ.)

7. अपघातग्रस्त असल्यास पोलिस FIR किंवा डायरीची प्रत (MLC मान्य नाही)

8. प्रत्यारोपण प्रकरणात ZTCC अथवा अधिकृत समितीची मान्यता

9. रुग्णालय मुख्यमंत्री निधी प्रणालीत नोंदणीकृत असणे आवश्यक

अर्ज प्रक्रिया :

1. अर्जाचा नमुना या लिंकवरून डाउनलोड करा.

https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/medical%20form.pdf

2. आपले रुग्णालय निधी योजनेत सामील आहे का, ते ही लिंक तपासा.

https://docs.google.com/spreadsheets/d/1QUODMYZ8oY1lPyY2vl1dsX4w6MzBfaGB/edit?gid=1178235983#gid=1178235983

3. अर्जातील आजार यादीतील आपला आजार निश्चित करा.

4. सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज पूर्ण करा.

5. संपूर्ण अर्जासोबत ईमेलद्वारे aao.cmrf-mh@gov.in या पत्त्यावर पाठवा किंवा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात सादर करा.

6. अर्जाचा स्टेटस तपासण्यासाठी ही लिंक वापरा किंवा 9321103103 या क्रमांकावर संपर्क करा.

https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action

ही योजना गरजूंसाठी मोठा दिलासा देणारी आहे. वेळेवर अर्ज करून आपणास लाभ मिळवता येईल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eight + 8 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.