Mughals in India : भारतात मुघलांनी तब्बल शेकडो वर्ष आपले साम्राज्य चालविले.यात जगातील मध्यपूर्व भागातील अनेक आक्रांत्यांनी त्या काळात भारतावर हल्ले केले.यानंतर अखंड भारतावर हल्ले होत असतानाच नंतर मुघलांचे साम्राज्य अस्तित्वात आले.
मुघल बादशहांच्या कार्यकाळात निर्माण झालेल्या अनेक वास्तू स्मारके आजही भारतात अस्तित्वात आहेत.ताजमहाल, लाल किल्ला बुलंद दरवाजा,कुतुब मिनार सारख्या इमारती सह पर्शियन स्थापत्यकला आणि वास्तूचा नमुना असलेल्या अनेक इमारती आहेत.
मुगल साम्राज्याचा इतिहास आणि स्थापत्य वास्तूशैली आजही जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.भारतात मुघल साम्राज्याचा उदय केव्हा झाला.मोघल भारतात कुठून दाखल झाले.
त्यांनी किती वर्ष साम्राज्य गाजविले याचा इतिहास भारतात आणि जगासमोर आहे.मात्र भारतात 900 वर्षे शासन करणाऱ्या विविध मुघल बादशहा आणि साम्राज्यकर्त्यांना मुघल नेमके का म्हटले जाते? हा सर्वसामान्य प्रश्न आणि मुघल हा शब्द नेहमी कानावर पडतो.तर आपण जाणून घेवू घ्या मुघलांना मुघल का म्हटले जाते ?
भारतात मुघल हे 1526 पूर्वी आपले साम्राज्य विस्तार करताना दाखल झाले होते.इतिहासामधील नोंदीनुसार भारतात मुगल बादशाह बाबरने1526 मध्ये भारतात आपल्या साम्राज्याची स्थापना केली बाबरच्या काळात मुघल साम्राज्य भारतात स्थापित झाले.
इसवी सन 1700 जवळपास मुगल बादशाह औरंगजेबच्या मृत्यूनंतर भारतात मुघल साम्राज्याचा ब्रिटिश साम्राज्यकर्त्यांनी पतन केला.{British Empire In India}.मात्र मुघलांना मुघल का म्हटले जाते हा महत्त्वाचा प्रश्न आहे ते आपण जाणून घेऊया….
Mughals in India : पर्शियन भाषेमधील शब्द.
भारतात मुघल शब्द दाखल होण्यापूर्वी हा प्राचीन पर्शिया {सध्याचे इराण} मध्ये पर्शियन भाषेमधील शब्द आहे. यातून मुगल शब्दाचा उगम आहे.मुघल हा शब्द मंगोल शब्दाच्या मांगोळ या शब्द प्रथेवर आधारित आहे.ऐतिहासिक नोंदीनुसार भारतात दाखल झालेले मुघल हे तुर्क आणि मंगोल शासकांचे वंशज होते.
मुघल आणि मंगोल वंशाचा संबंध.
भारतात साम्राज्य विस्तार करण्यापूर्वी मुघलांचा मंगोल वंश आणि तुर्क वंशासोबत संबंध आहे.मुघल हे तुर्क आणि मंगळ शासकांचे वंशज होते.तुर्क,मंगोल आणि मुगल वंशाचा उगमस्थान हा आशिया खंडातील समरकंद आहे. त्यामुळे मुघल वंश चंगेज खान आणि तुर्की मधून भारतात आक्रमण करणाऱ्या तैमूर लंग सोबत अनुवंशिक संबंध आहे,असे मानले जाते.
बाबर आणि मंगोल वंशाचे संबंध.
भारतात मुगल साम्राज्याची स्थापना करणाऱ्या बाबरचे मंगोल वंश सोबत संबंध हे बाबरची आई कुतलुग निगार खानममुळे.ती मंगोल वंशाची होती,आणि बाबर चे वडील हे आशियामधील तुर्क होते.
यामुळेच बाबरवर मंगोल वंशाचा आईमुळे आणि वडिलांची पार्श्वभूमी तुर्कवंशा सोबत जोडली असल्याने बाबर वर एकूणच मंगोल आणि तुर्क वंशाचा प्रभाव होता.बाबर आणि त्याच्या कुटुंबीयांनी आपला मोठा वेळ तुर्कीमध्ये घालविला.यामुळे भारतात साम्राज्य विस्तारत असताना बाबरच्या शासनकाळात वास्तुकलेत तुर्क,पर्शियन संस्कृतीचा आणि मंगोल वंशाचा प्रभाव होता.
मुगल साम्राज्याचा उदय आणि पर्शियन भाषा,संस्कृती.
भारतात जेव्हा मुगल साम्राज्याचा उदय झाला त्या काळापासून भारतीय संस्कृतीत पर्शियन भाषा{फारसी} आणि पर्शियन संस्कृतीचा प्रवेश झाला.यापूर्वी बाबर आणि त्याच्या वंशाकडून पर्शियन भाषा,पर्शियन कला आणि तेथील संस्कृतीचा स्वीकार झाल्याने भारतात साम्राज्य करीत असताना मुघल काळात पर्शियन आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ होताना दिसते.
भारतात मुघल शासकांनी साम्राज्य विस्तारताना पर्शियन आणि तुर्की संस्कृतीमधील जी स्थापत्य कला आणि कारागिरी आहे,त्याचा भारतात वापर केला.मुगल काळात शासकांनी आपल्या मूळ देशातील आणि मध्यपूर्व भागातील कारागीर आणि कलाकारांना भारतात आणून त्यांच्याकडून अनेक राजवाडे,महाल,वास्तू आणि स्मारके तयार केली.यामुळे एका प्रकारे मुघल काळात भारतात मुघलांकडून मध्य पूर्वेतील स्थापत्यकला त्या काळातील अखंड भारतात दाखल झाली.
इस्लामिक कला संस्कृती आणि प्रशासनिक व्यवस्था.
मुघल शासकांनी आपल्या साम्राज्याचे विस्तार करताना इस्लामिक कला येथे आणली.विशेष म्हणजे मुगल शासकांनी भारतात आपल्या कार्यकाळात इस्लामिक प्रशासनिक व्यवस्थेनुसार आपल्या साम्राज्याचे संचलन केले. आणि भारतात यामुळे इस्लामी साहित्य दाखल झाले.नेमक्या याच कारणांमुळे मुघल मंगोल परंपरेपासून वेगळे झाले.
अशी झाली मुघल म्हणून ओळख.
मुघल शब्द भारतात आलेल्या तुर्क आणि मंगोल शासकांच्या वंशजाकरिता वापरला जातो.भारतात साम्राज्य विस्तार करण्यापूर्वीच मुघलांचा मंगोल वंश आणि तुर्क वंशासोबत संबंध आहे.
मुघल हे तुर्क आणि मंगोल शासकांचे वंशज होते.मात्र अखंड भारतात मुघल-शासक हे पर्शियन भाषा संस्कृती आणि भारतीय संस्कृती मध्ये वास्तव्य करीत असताना मुघलावर मंगोल वंशाचा पुढे प्रभाव कमी झाला.भारतात पर्शियन,तुर्क कला संस्कृती आणि वास्तुकलेला मुघल शासकांनी प्रोत्साहन दिले.
इस्लामिक राज्य व्यवस्था चालविताना भारतातील त्या काळातील शासकाना पुढे मुघल संबोधले जात होते.त्यामुळे आता तुर्क मंगोल वंशजांचे भारतातील ते शासनकर्ते मुघल म्हणून आजतागायत ओळखले जातात.