MSRTC Travel Scheme : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आता प्रवाशांना महाराष्ट्र आणि पण राज्यात भ्रमण करण्यासाठी एसटीतून प्रवास करिता नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे नाव MSRTC ने “कुठेही फिरा”पास योजना असे दिले आहे.प्रवास करण्यासाठी एचटीमहामंडळाला एकदा पैसे अदा केले की,भ्रमंतीसाठी पास मिळणार आहे.
महामंडळाकडून या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे.{MSRTC New Scheme}.एसटी मधून प्रवास करण्यासाठी ठराविक कालावधीसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी आणि इतर राज्यात प्रवास करण्याची संधी या योजनेतून मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची योजना काय आहे? यामध्ये कोणत्या प्रकारची प्रवास पास मिळणार आहे? त्याची वैधता आणि ही पास कशी मिळेल?याबाबतची माहिती आपण या माध्यमातून जाणून घेऊया.
- MSRTC कडून नुकतेच ही “कुठेही फिरा” पास योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे यात दोन प्रकारचे पास एसटी प्रवासासाठी मिळणार आहे.
4 दिवसांचा पास
कुठे फिरायला या योजनेतून एसटी प्रवाशांमध्ये प्रौढ व्यक्तीला {18 वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीला}
साधारण एसटी बस प्रवास करण्यासाठी 750 रुपये.
निम आराम एसटी बस मध्ये प्रवास करण्यासाठी 1200रुपये.
आराम बस मध्ये प्रवास करण्यासाठी 1800रुपये.
शिवनेरी आणि शिवशाही बस मधून प्रवास करण्यासाठी 2500 रुपये अदा करावे लागेल. - या पासच्या माध्यमातून अख्या महाराष्ट्रात आणि इतर कोणत्या प्रांतात चार दिवसांमध्ये कुठली यात्रा किंवा प्रवास करता येणार आहे.
- 5 ते 12 वर्षे वयातील लहान मुलांसाठी पास शुल्क
साधारण बससाठी 375
निमआराम एसटी बससाठी 600 रुपये
आराम बससाठी 900 रुपये
शिवशाही/शिवनेरी बससाठी 1250 रुपये द्यावे लागेल. - 7 दिवसांचा पास
प्रौढ व्यक्ती (१८ वर्षे आणि यापेक्षा जास्त वय असलेले):
साधारण बस: 1200
निमआराम बस: 2000
आराम बस: 3000
शिवनेरी/शिवशाही बस: 4000 - लहान मुले (5 ते १12 वर्षे)
साधारण बस:600
निमआराम बस: 1000
आराम बस: 1500
शिवनेरी/शिवशाही बस: 2000
असे आहेत “कुठही फिरा”पासचे फायदे.
होते आर्थिक बचत
एकावेळीच ही पास खरेदी केल्यावर निश्चित अवधीत कितीही वेळा STप्रवास करता येतो,यावर कोणतीही मर्यादा नसते. हे नियमित ST प्रवास करणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर आहे.या पास योजनेमध्ये महामंडळाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही मार्गावर, कोणत्याही वेळी,कितीहीदा प्रवास करता येते.आपल्या जवळच्या पास प्रकारानुसार,निवडीच्या ST बसमधून प्रवास करू शकतो.
MSRTC Travel Scheme : असे होते आंतरराज्य ST प्रवास
या माध्यमातून महारासह या पासचा वापर शेजारील राज्यांमध्ये जाण्यासाठी ST प्रवास करता येते,गोवा, कर्नाटक,आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यात या पास च्या माध्यमातून प्रवास सुलभ होतो.
तर सुट्टीच्या काळात ही पास योजना एक उत्तम पर्याय आहे.सुट्टीच्या काळात,अनेक ठिकाणे फिरण्याची योजना या पास मुळे सुलभ होऊन ST प्रवास खर्च कमी होतो.
तर यासाठी कोणत्याही ST Booking आणि आरक्षणाची गरज राहत नाही, या पास चा वापर करून आरक्षण न करताही कोणत्याही उपलब्ध एस टी बसमध्ये सहज प्रवास करता येते.
- अशी काढा कुठेही फिरा योजनेची पास?
MSRTC च्या या योजनेतून पास काढण्यासाठी खालील पद्धत आहे. - पहिले एसटी आगारास {ST Depot}मध्ये जावून पास काढण्यासाठी माहिती घ्या.
- ही लागते आवश्यक कागदपत्रे.
यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे
आधार कार्ड
पॅन कार्ड
अलीकडे काढलेला पासपोर्ट फोटो.
आवश्यक शुल्क (Cash, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPIद्वारे)
असे करा अर्ज.
तिकीट काउंटरवर उपलब्ध असलेला अर्ज भर या अर्जात आपले संपूर्ण नाव
पत्ता
मोबाईल नंबर
इमेल आयडी(असल्यास)
प्रवासाचा कालावधी
निवडलेला पास प्रकार नमूद करावे लागते.
आपल्या निवडलेल्या पास प्रकारानुसार आवश्यक शुल्क भरा.
अशी मिळवा आपली पास.
ST Depo कडून या योजनेतून पास ताताकाळ जारी होतो.पास मिळाल्यानंतर त्यावरील माहिती तपासून पहा आणि कोणतीही त्रुटी आढळल्यास,लगेच काउंटर कर्मचाऱ्यांना सूचित करा.
सोबतच ST प्रवास पास वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.यात ही पास वैयक्तिक असेल तर ज्या व्यक्तीच्या नावावर पास जारी आहे,त्याच व्यक्तीने तो वापरला पाहिजे.
कारण असा पास हस्तांतरणीय नसतो.सदर पास सुरक्षित ठेवा,हा पास जर हरविला तर डुप्लिकेट पास मिळत नाही सोबतच MSRTC कोणताही परतावा देत नाही.
इतकी असते वैधता कालावधी
सदर ST Bus पास निर्धारित कालावधीसाठीच वैध असते.याची वैधता संपल्यानंतर, नवीन पास काढावा लागेल.आपला पास ज्या प्रकारच्या बससाठी बनविला केला आहे, त्याच बसेसमध्येच प्रवास करा.साधारण बस पासधारकांना शिवनेरी/शिवशाही बसमध्ये प्रवास करता येणार नाही.
हे आहेत ST पास चे नियम आणि अटी.
ही पास खरेदी करताना, आपल्या वयानुसार योग्य प्रकारचा पास निवडा.
लहान मुलांसाठी (5 ते 12 वर्षे) आणि प्रौढांसाठी (18 वर्षे व त्यापेक्षा जास्त) वेगवेगळे ST प्रवास दर आहेत.
यात काही अपवाद असते.जसे 5 वर्षांखालील मुलांना मोफत ST प्रवास करता येतो, मात्र त्यांना स्वतंत्र सीट मिळत नाही.सोबतच ST बस उपलब्धताबाबत पास असूनही, बसमध्ये रिक्त जागा असल्यासच प्रवास करता येईल.गर्दीच्या वेळी किंवा सणावारांच्या काळात बस बस भरलेली असल्यास यातून प्रवासाला उशीर होऊ शकतो.
तर आरक्षित सेवामध्ये काही विशेष आरक्षित सेवांमध्ये या पासचा वापर होत नाही. याकरिता अतिरिक्त शुल्क भरावे लागते.