MSRTC New Rule : एसटी महामंडळाने केले काही नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास बंद. एस टी महामंडळाचा मेगा डिसिजन!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेत एसटी मधून मोफत प्रवास बंद केला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळ वेळोवेळी विविध निर्णय घेते,सोबतच विविध प्रवासी योजना महामंडळ अमलात आणते.मात्र आता एसटी प्रवासासाठी विविध सुविधांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ महामंडळाच्या या निर्णयामुळे मिळणार नाही. मात्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या जुन्या धोरणात बदल करताना एसटीला आर्थिक फायद्यात आणण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. एसटी महामंडळाच्या या नव्या धोरणामुळे राज्यातील जेष्ठ नागरिकांना आता एसटी बस मध्ये मोफत प्रवासाचा लाभ मिळणार हे विशेष.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत प्रवासी योजना.
उल्लेखनीय म्हणजे एसटी महामंडळाने मागील वर्षी महत्त्वाची घोषणा करताना राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता तो अमलात आणला आहे.योजनेचे नाव अमृत योजना असे होते यात 65 वर्षांमधील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. महामंडळाने महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या समाजाबद्दल योगदानाचा सन्मान आणि त्यांना पुन्हा सक्रिय करणे आणि सामाजिक कामांसाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे.सर्व जेष्ठ नागरिकांसाठी आता मोफत प्रवास सुविधा सुरू करण्यात आली आहे, या मोफत यात्रेसाठी ज्येष्ठ नागरिकांना फक्त आपला कोणताही वैध ओळखपत्र किंवा आधार कार्ड दाखवून विनामूल्य एसटीचा प्रवास करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.
महिला प्रवाशांसाठी आणल्या आकर्षक प्रवास योजना.
महाराष्ट्र राज्यात महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम मांडण्यासाठी विविध योजना अमलात येत आहे. यात एस टी महामंडळांनेही एक पाऊल टाकले आहे.महामंडळाच्या नव्या धोरणानुसार राज्यभरातील सर्व महिला प्रवाशांना आता सर्व प्रकारच्या एसटी बसेसच्या तिकिटांवर 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे आता महिलांना 50 टक्के तिकीट दर देऊन म्हणजे अर्ध्या तिकिटावर कुठेही प्रवास करता येणार शक्य होणार आहे. महामंडळाच्या जनरल बस एअर कंडिशनर बस स्लीपर कोच अशा सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये महिलांना 50 टक्क्यांची सवलत मिळणार असून महिलांना आपले आधार कार्ड किंवा कोणताही वैदध ओळखपत्र प्रस्तुत करून असा प्रवास करणे सुलभ होणार आहे.
गंभीर आजारांच्या रुग्णांना एसटीतून विशेष सुविधा.
समाजात विविध गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण असतात त्यामुळे सामाजिक सेवाभावातून एसटी महामंडळाने अशा गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी विशेष निर्णय घेतला आहे. आता राज्यात कुठेही उपचारासाठी गंभीर आजाराच्या रुग्णांना प्रवासात नेतांना तिथून कोणतीही अडचण येऊ नये याची विशेष काळजी घेतल्या जाईल. हिमोफेलिया डायलिसिस साठी जाणारे रुग्ण, सिकलसेल, एचआयव्ही बाधित गंभीर आजारांच्या रुग्णांना एसटी बसच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या नवे आदेशात अशा गंभीर आजारांना फक्त साधारण एसटी बसेसचा मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात यावी असे प्रावधान केले आहे. विशेष म्हणजे पूर्वी रुग्णांना महामंडळाच्या आरामदायी आणि आवश्यक सुविधा असलेल्या एसटी बस मध्ये मोफत प्रवास करण्याची अनुमती होती आता सर्वसाधारण बस मध्ये गंभीर आजाराच्या रुग्णांना प्रवास करता येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक,महिलाना दिलासा मिळणार.
एस टी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध केल्याने अशा नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी होणार आहे. यामुळे ते आपल्या दूरच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आर्थिक खर्चापासून वाचणार असून त्यांचे सामाजिक जीवन यामुळे जास्त सक्रिय होऊन ज्येष्ठ नागरिक यामुळे आनंदित होणार आहे. तर महिलांना सर्व प्रकारचे बसेस मध्ये 50% तिकीट दरात सवलत मिळेल त्यामुळे महिलांना आर्थिक दिलासा मिळण्यासोबत शिक्षण आणि नोकरीच्या कामासाठी जाताना आर्थिक सोय होणार आहे. यामुळे त्यांना जास्त पैसे तिकिटावर खर्च करावे लागणार नाही. विशेष करून ग्रामीण भागातील गरीब महिलांसाठी शहरी कामासाठी येणे जाणे अधिक सुविधा त्यांना होऊन त्यांना शहरातील विविध सुविधा यामुळे मिळणार आहे.
गंभीर आजाराच्या रुग्णांसंबंधी निर्णयाला विरोध.
तर दुसरीकडे गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी एसटी महामंडळाने केलेल्या या बदलावामुळे अनेक सामाजिक आणि रुग्ण सेवा संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये महामंडळाच्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना फक्त आरामदायी बसेस मध्ये प्रवास करणे सोयीचे राहते आणि समाजात अशा रुग्णांना आरामदायी प्रवास करण्याचा अधिकार आहे,त्यामुळे महामंडळाने त्यांना नियमित बस सेवा मध्येच सवलत दिल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हे गैरसोयीचे ठरणार आहे, असे या निर्णयाविरोधात बोलणाऱ्यांचे मत आहे.
नवीन योजनांमुळे एसटी महामंडळा वर काय आर्थिक परिणाम होणार.
राज्य एसटी महामंडळाकडून नवीन योजनांचा निर्णय घेऊन याचे अंमलबजावणीमुळे महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर याचा खूप परिणाम होणार आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मोफत प्रवास आणि अर्ध्या तिकिटावर प्रवासाची सुविधा दिल्याने महामंडळाचे आर्थिक उत्पन्न कमी होणार आहे. मात्र यामुळे एसटी बस मध्ये यात्रा करण्यासाठी प्रवासी नागरिक महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार, त्यामुळे सवलत योजनेमुळे होणारा नुकसान प्रवासी संख्या वाढल्याने कमी होईल.महामंडळाला अशीही अपेक्षा आहे.
विविध समस्यांचा सामना करीत आहे एसटी महामंडळ.
विशेष म्हणजे कोरोना महामारी लॉक डाऊन आणि एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक महिने सुरू असलेल्या काम बंद आंदोलनामुळे महामंडळ मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीत वावरत आहे. महामंडळासमोर विविध आव्हाने आहेत यात एसटी बस मध्ये प्रवाशांची संख्या वाढवली यासाठी विविध सवलतीच्या योजना देणे प्राप्त आहे. त्यामुळे महामंडळाला एकूणच आर्थिक नुकसान होतो तर दुसरीकडे महामंडळाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवणे हे दुसरे आव्हान आहे. एसटी महामंडळा समोर खाजगी बस सेवा सुद्धा एक मोठा आवाहन आहे. खाजगी प्रवासी वाहतूकदारांची स्पर्धा करताना एसटीकडे प्रवाशांना आकर्षित करणे हे सोपे काम नव्हे, यात आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंधन दरात दिवसागणिक वाढ आणि एसटी बसेसची देखभाल, त्याच्यावर होणारा खर्च यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी एसटी महामंडळ भविष्यात काय मार्ग काढतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे