MSRTC Electric Buses : आता रस्त्यावर धावणार इलेक्ट्रिक लाल परी! महाराष्ट्रात एसटीचे रंग रूप बदलणार!!

MSRTC Electric Buses : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात द्वारे आता प्रवाशांच्या सेवेसाठी सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यासाठी आता महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊले उचलण्यात सुरुवात केलेली आहे.

महाराष्ट्रात एसटी सेवा आधुनिकीकरण करण्यासाठी राज्यात महायुती सरकार लाल परीचे एकंदर रूप बदलणार आहे.यासाठी फडणवीस सरकारने राज्य परिवहन महामंडळासाठी मास्टर प्लान तयार केला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

राज्यभरातील प्रवाशांना एसटीमधून आरामदायी आणि लाभकारी प्रवास करता यावा,प्रदूषण नियंत्रण राहावे,यासाठी आता महाराष्ट्रात एसटी सेवा इलेक्ट्रिक बस सेवा होणार आहे.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी 5150 इलेक्ट्रिक ST बस खरेदी करण्याची योजना आखली आहे.उल्लेखनीय म्हणजे सरकारने प्रथम टप्प्यात एसटी महामंडळासाठी 450 इलेक्ट्रिक बसेस यापूर्वीच खरेदीसुद्धा केलेले आहे.

यामुळे आता महाराष्ट्रात डिझेलवर चालणाऱ्या एसटी बसेस आता इलेक्ट्रिक बसेस आणि CNG,LNG आधारित बसेस एसटी बसेस रूटवर धावतील.{MSRTC Electric ST Bus Service}.

महाराष्ट्र सरकारने प्रवाशांसाठी आर्थिक परवडणारे असे MSRTC साठी हे निर्णय घेतले आहे.यामुळे राज्य परिवहन महामंडळाची सेवा सुधारणा आणि महामंडळाचा इंधन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवासी आणि एसटी कर्मचारी सुविधांमध्ये वाढ होणार आहे.

यासाठी अमल बजावणी सुरू केली आहे.एसटी महामंडळात सुविधांमध्ये सुधारणेच्या दिशेने सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

5 हजार 150 इलेक्ट्रिक ST बस खरेदी करण्याची योजना आखली.

महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाच्या {MSRTC}एसटी बस इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहे.यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विधिमंडळात याची माहिती दिलेली आहे.

विधिमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले आहे की,सरकारने एसटी महामंडळाच्या सर्व बसेसना आता हळूहळू अपारंपारिक इंधन स्त्रोतांवर चालविण्यासाठी ST बसेसना इलेक्ट्रिक वाहनात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पर्यावरण सुरक्षा होईल आणि मोठ्या प्रमाणात इंधन खर्च कमी होऊन महामंडळाचे आणि सरकारचे एसटीवर होणारे इंधन खर्च मध्ये बचत होणार आहे.

सरकारने एसटी महामंडळासाठी आता एकूण 5 हजार 150 इलेक्ट्रिक ST बस खरेदी करण्याची योजना आखली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.सध्या 450 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात आल्या असून उर्वरित एसटी बसेस विविध टप्प्यात एसटी रूटवर धावतील.

MSRTC Electric Buses : LNG इंधन पुरवठा करिता करार

याशिवाय सरकार सध्या LNG इंधनवर ST बसेस चालविण्यासाठी आवश्यक उपाय योजना करीत आहे.महाराष्ट्र सरकारने नुकतेच एसटी बसण्यासाठी LNG इंधन पुरवठा करिता करार केला आहे.

या अंतर्गत भविष्यात एसटी महामंडळाची एसटी सेवा अधिक सक्षम होईल,असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा राज्यात चलन आणि वापर वाढावा यासाठी सरकार विशेष प्रयत्न करीत आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणांवर इलेक्ट्रिक एसटी बसेस साठी आणि सर्व प्रकारचे खाजगी इलेक्ट्रिक बसेससाठी आधुनिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे.एकूणच सरकार आता सार्वजनिक वाहतूक यंत्रणा संचालन दरम्यान पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करण्यावर भर देत आहे.

30 लाख पेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% प्रस्ताव मागे घेतला.

विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने यावर्षी 2025-26 च्या अर्थसंकल्पात राज्यात 30 लाख पेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6 टक्के कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता.मात्र आता सरकारने हा टॅक्स लावण्याचा निर्णय मागे घेतला आहे.अशी माहिती CM फडणवीस यांनी विधिमंडळात दिली.

आमदारांना आता फक्त EV वाहनांसाठीच कर्ज.

राज्यात रस्त्यावर इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यासाठी सरकारने नवे धोरण आखले आहे.आता राज्य सरकारच्या सर्व शासकीय कार्यालयांना फक्त इलेक्ट्रिक वाहनेच वापरली जाणार आहे.यासाठी सरकारने नियोजन केले आहे.

सोबतच सर्व आमदारांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी वाहन कर्जावरील व्याज सवलत ही फक्त इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी लागू असेल.तसेच मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांची वाहने आता इलेक्ट्रिक वाहने असतील.

सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे भविष्यात एसटी आणि खाजगी वाहन सेवा आणि सुविधा अधिक पर्यावरण पूरक आणि खर्च कमी करणारी ठरेल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

9 − one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.