MSRTC Buses Live Location : आता जाणून घ्या, एसटी बसेसचे लाईव्ह लोकेशन आपल्या मोबाईलवर !

MSRTC Buses Live Location : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ द्वारे प्रवाशांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.MSRTC New Service For Passengers महामंडळाच्या एसटी बस मधून प्रवास करण्यापूर्वी संबंधित एसटी गाडीचे लाईव्ह लोकेशन Live Location आता प्रवाशांना आपल्या स्मार्टफोन मोबाईल मधून मिळणार आहे.

यात्रेसाठी हवी असलेली एसटी बस कोणत्या मार्गावर धावत आहेत किंवा ते प्लॅटफॉर्मवर आहे किंवा नाही याचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईल वरूनच मिळणार आहे. नुकतेच एम एसआरटीसी ने ही प्रवासी सुविधा सुरू केलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

एसटी बस मधून एसटी बस मधून प्रवास करण्यापूर्वी यात्रेकरूंना चिंता असते की, प्लॅटफॉर्मवर एसटी महामंडळाची बस लागलेली आहे,किंवा ती बस स्थानकावर केव्हा पोहोचेल.अनेकदा प्रवासापूर्वी एसटी बसचे वेळापत्रक ST Bus Time Table बिघडून जाते तर कधी एसटीतून बाहेर गावावरून आपल्या गावात येणारे कुटुंबीय किंवा नातेवाईक यांना घेण्यासाठी बस स्थानकावर जावे लागते,अडवांस तिकीट बुकिंग केली तरीही आवश्यक एस टी बस चे लोकेशन मिळत नाही.

जर एसटी बस उशिरा पोहोचत असेल तर ते कुठे असेल याची थेट माहितीही मिळत नाही. मात्र एसटी महामंडळाने आता या सर्व अडचण दूर केल्या असून विविध मार्गांवर धावणाऱ्या एसटी बसेस सध्या कुठे धावत आहेत हे आता लाईव्ह लोकेशन Vehicle Track Live Location द्वारे कळणार आहे.

तिकीट वर नमूद कोड टाकताच प्रवाशांना ST Location उपलब्ध होईल.

MSRTC ची ही आधुनिक संचार सेवा मानली जात आहे. यामुळे आता खाजगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांप्रमाणेच राज्य परिवहन सेवेची एसटी बसचा लोकेशन कुठे आहे,हे प्रवाशांना आपल्या मोबाईल ऍप वरून कळणार आहे. यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाने एक विशेष मोबाईल एप्लीकेशन बनविला आहे.

या माध्यमातून प्रवाशांना एसटी बसचे थेट लोकेशन आपल्या मोबाईल मधून मिळणार आहे.विशेष म्हणजे बुकिंग केलेल्या एसटी तिकीट वर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून एसटी बस बसस्थानकावर नेमक्या कोणत्या वेळी येणार आणि त्याचे लाईव्ह रूट सुद्धा आता समजणार आहे.

सर्व एस टी बसेस मध्ये व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम Vehicle Tracking System (VTS) लावून लाईव्ह लोकेशन सिस्टम ने जोडण्याची सुरुवात

महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाची एसटी बसेस प्रवासासाठी महत्त्वाचे आणि स्वस्त साधन आहे.मात्र अनेक बसेस स्थानकांवर एसटी बसेसचे फेरी मर्यादित असतात.त्यामुळे तेथील प्रवाशांना आपल्या बस स्थानकावर एसटी बस कधी पोहोचणार याची माहिती मिळत नसते, तर दुसरीकडे यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांना तासानतास ताटकळत बसावे लागते.

सर्वसामान्य प्रवाशांची ही अडचण लक्षात घेता आता एसटी महामंडळाने आपल्या एसटी बस ताफ्यातील सर्व एस टी बसेस मध्ये विशेष असे व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम अर्थातच Vehicle Tracking System (VLT) लावून लाईव्ह लोकेशन सिस्टम ने जोडले आहे.

प्रत्येक ST बस मध्ये ही व्हीएलटी सिस्टम लावली जाणार आहे.आणि एसटी महामंडळाने तयार केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन वरून आता एसटी बसची माहिती आणि विविध मार्गांवर धावणाऱ्या एसटी बसचे लोकेशन तिकीट वर नमूद कोड आणि क्रमांक टाकताच प्रवाशांना उपलब्ध होईल.

उल्लेलखनीय म्हणजे महाराष्ट्रात दररोज 50 हजार विविध मार्गांवर एसटी महामंडळाच्या 1 लाख 25 हजार ST बसेस धावतात. यात अनेक प्रवासी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी तिकीट एडवांस मध्ये बुक करतात. मात्र यानंतरही प्रवासासाठी लागणारी एसटी बस सध्या कोणत्या ठिकाणी आहे.

पुढील थांब्यावर ती केव्हा पोहोचणार ? याची माहिती प्रवाशांना मिळत नाही.यासाठी आता महामंडळाने VLT सिस्टीमच्या मदतीने एसटीचे बस पुढील बस स्थानक, विविध मार्गावरील बस थांबे आणि एप्लीकेशनच्या माध्यमातून निवडलेल्या बसस्थानकात एसटी बस येण्याचा अपेक्षित वेळ 24 तास आधीच प्रवाशांना समजणार आहे.

एसटी बसेसचे संपूर्ण रूट मॅपिंग.

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून हा विशेष एसटी बस लाईव्ह लोकेशन सिस्टम आणि मोबाईल ॲप्लिकेशन बनविला आहे. महामंडळासाठी रोस मारटा Rose Marta या कंपनीने महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाचे बसचे संपूर्ण रूट मॅपिंग करून याचे या सिस्टम मध्ये इंटिग्रेशन पूर्ण केले आहे.

याचे सध्या वार्षिक ऑपरेशनल पॅटर्नमध्ये बदल करून त्याला इंटिग्रेड करण्याचे काम सुरू आहे.येत्या काही आठवड्यात हे काम महाराष्ट्रात पूर्ण होणार आहे.

मुंबई सेंटर मध्यवर्ती कार्यालयात आधुनिक आणि अपडेट कंट्रोल रूम.

यामुळे एसटी प्रवाशांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन बुक केलेले तिकीट वर ट्रिप कोड असेल. हे कोड एसटी लाईव्ह लोकेशन एप्लीकेशन मध्ये हवी असलेली एसटी बस ट्रॅक करण्यासाठी टाकतात,संबंधित एसटी बसचे लोकेशन आणि रूट अगदी काही सेकंदात समजणार आहे.

या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून याव्यतिरिक्त इतर मार्गावरील एसटी बस गाड्यांचा वेळापत्रक,आणि सर्व एसटी गाड्यांचे स्टॉपेज सुद्धा करणार आहे.एसटी महामंडळ प्रशासनाने या सिस्टम वर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटी मुंबई सेंटर मध्यवर्ती कार्यालयात आधुनिक आणि अपडेट केलेला कंट्रोल रूम बनविला आहे.येथून राज्यभरातील एसटी बसेसचे संचालन आणि नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

fifteen − 9 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.