MSRTC Buses Live Location App : महाराष्ट्रात आता राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट बुकिंग केल्यानंतर ज्या एसटी बस मधून प्रवास करायचा आहे,त्या ST बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईल फोनवरून मिळणार आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एसटी बसेस मधून नागरिक प्रवास करतात.एमएसआरटीसी एसटी बसेस मध्ये प्रवास करण्यासाठी बस स्थानकावर पोहोचल्यास निर्धारित एसटी बस स्थानकावर केव्हा पोहोचेल किंवा तेथे आली नसेल तर त्याचा लोकेशन काय आहे,याची माहिती मिळविण्यासाठी प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो.मात्र आता एमएसआरटीसी ने प्रवाशांची ही अडचण आधुनिक तंत्रज्ञान वापरात आल्याने दूर होणार आहे.
एसटी महामंडळाची बस सध्या कुठे आहे,ते बसस्थानकावर केव्हा येईल,त्याचे रूट काय असेल,ही सर्व माहिती आता प्रवाशांना प्रवासापूर्वीच आपल्या स्मार्टफोनमध्ये मिळू शकेल,अशी टेक्नॉलॉजी एमएसआरटीसी वापरत आहे.तर चला जाणून घेऊया याबाबत आपण माहिती…..
एसटी प्रवाशांसाठी एमएसआरटीसी करून आनंदाची वार्ता.
राज्यभरातील एसटी प्रवाशांसाठी एमएसआरटीसी कडून आनंदाची वार्ता देण्यात आलेली आहे.आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचे लाईव्ह स्टेशन प्रवाशांना आपल्या प्रवासापूर्वी समजणार आहे.एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी आणि कोणत्याही गावात जाण्यासाठी राज्यात लालपरी ही नागरिकांसाठी प्रवासाची जीवनदायींनी मानली जाते.
महाराष्ट्रात स्वस्त आणि सुविधा जनक प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात एसटी बस प्रवास हा चांगला पर्याय मानला जातो.राज्यात रेल्वेसह एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे.लालपरीचा प्रवास हा सुविधा जनक आणि स्वस्त आहे.
मात्र आतापर्यंत एसटी बसेस मध्ये प्रवास करण्यापूर्वी निर्धारित एसटी बस स्टैंड वर केव्हा येईल,त्याचा टाइमिंग काय आहे,ही अडचण तर होतीच. स्थानकावर निर्धारित वेळेवर पोहोचून सुद्धा तेथे एसटी बस आली नसल्याने प्रवाशांचा वेळ वाया जातो.मात्र आता एमएसआरटीसी ने हि अडचण दूर केली आहे.
- कारण आता एमएसआरटीसी एसटी बसेस लाईव्ह लोकेशन या आधुनिक यंत्रणेने संचालित होणार आहे.
- प्रवाशांना बसेसचे लाईव्ह लोकेशन स्मार्टफोनवरून त्या माध्यमातून मिळणार आहे.
- एकंदरच एसटी बसेस चा प्रवास आता हायटेक होताना दिसत आहे.
- प्रवाशांना निर्धारित बसचा लाईव्ह लोकेशन कळून ST Buses वेळेवर बसस्थानकवर पोहोचतील,आणि त्यांचा Timing आणि लोकेशन प्रवाश्यांना आधीच कळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
MSRTC Buses Live Location App : काय आहे एसटी बस लाईव्ह लोकेशन सुविधा.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून {MSRTC}नुकतेच एसटी बस लाईव्ह लोकेशन एप्लीकेशन करण्यात आलेले आहे.{ST Bus Live Location App}.या माध्यमातून सुविधा उपलब्ध होईल.
या Mobile Application द्वारे एसटी बस प्रवास करण्याकरिता प्रवाशांनी काढलेल्या तिकीट क्रमांकावरून त्यांच्या एसटी बसचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे,अशी माहिती एमएसआरटीसी प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
- एसटी बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी बसचे लाईव्ह लोकेशन समजावे,यासाठी एमएसआरटीच्या बस आता मध्यवर्ती नियंत्रण कक्षासोबत एसटी बसेस आता वेहिकल ट्रेकिंग सिस्टम जोडले जाणार आहे.
- येणाऱ्या काही दिवसात एमएसआरटीसी द्वारे टेक्नॉलॉजी महाराष्ट्रातील सर्व एसटी बसेस ला जोडण्यात येईल.एमएसआरटीसी. कडून या व्हीकल ट्रेकिंग सिस्टीम साठी संपूर्ण महाराष्ट्राचे एसटी बसेस चे रूट मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.काही दिवसात याचे काम पूर्ण होतात प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
- तिकीट बुक केल्यानंतर प्रवासापूर्वी एसटी बसेस सध्या कुठे धावत आहे.
- अपेक्षित एसटी बस बसस्थानकावर कधी पोहोचणार यासंदर्भात माहिती प्रवाशांना एमएसआरटी सीच्या मोबाईल ॲप्लिकेशन माध्यमातून मिळणार आहे.
- यामुळे प्रवाशांना वेळे संदर्भात अडचणीचा सामना करावा लागणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- एसटी महामंडळाद्वारे सर्व एसटी बसेसना वेहिकल ट्रेकिंग सिस्टम बसवले जाणार आहे.यामुळे एसटीचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना लवकर मिळेल.
- या Live Location मोबाईल ॲप्लिकेशन माध्यमातून प्रवाशांना दोन भाषांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
असे मिळणार एसटी बसेसचे लाईव्ह लोकेशन.
या क्षेत्रातील जाणकारांच्या मते राज्यात एसटी महामंडळाकडून आधुनिक लाईव्ह ट्रेकिंग सिस्टम पहिल्यांदा वापरात आणल्या जात आहे.एमएसआरटीसीच्या या एप्लीकेशन माध्यमातून एसटी बसचे लाईव्ह लोकेशन कळण्यासाठी या ॲपचा असा वापर होईल.
- सर्वात आधी एम एस आर टी सी च्या या मोबाईल ॲप्लिकेशन ला इन्स्टॉल करावा लागेल. Download App
- MSRTC App मध्ये ट्रॅक बस हा सेक्शन उघडावा लागेल.{}ST Bus Live Location System}
- तेथे बुकिंग केलेल्या तिकिटावर असलेला कोड टाकावा लागेल.{Ticket Code}
- हा कोड टाकताच प्रवाशांना एसटी बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे.
- या माध्यमातून अपेक्षित एसटी बस सध्या कोणत्या मार्गावर आहे,कोणत्या स्टापेजवर ही बस थांबेल,बस स्थानकावर त्याची पोहोचण्याची वेळ प्रवाशांना या माध्यमातून समजणार आहे.
असे होईल या Live Location प्रणालीचे संचलन
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून मुंबई येथील सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयातून या प्रणालीचे कंट्रोलिंग होणार आहे.{Centralized Controlling System}.
- यासाठी मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात याकरिता नियंत्रण कक्ष स्थापित झाले असून,येथून राज्यभरात विविध मार्गांवर धावत असलेल्या एसटी बसेस वर या आधुनिक ट्रेकिंग सिस्टम वरून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
- कोणत्याही मार्गात एसटीमध्ये तांत्रिक बिघाड आल्यास किंवा अपघातताच्या परिस्थितीत इमर्जन्सीमध्ये एमएसआरटीसीच्या या लाईव्ह लोकेशन ॲप मधून संबंधित मदत यंत्रणांना फोन करण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- सोबतच एसटी बस मध्ये कोण बस चालक आणि वाहक आहे,याची माहिती सुद्धा या ॲप्लिकेशन मधून मिळणार आहे.
- राज्यात कोणत्या मार्गावर एसटी महामंडळाच्या किती बस धावत आहेत.त्यांचा लोकेशन कुठे आहे,त्यांना निर्धारित स्थानकात पोहोचण्यात किती वेळ लागेल,यासारखी महत्त्वाची माहिती सुद्धा एमएसआरटीसीच्या या मोबाईल ॲप्लिकेशन आणि लाईव्ह ट्रेकिंग सिस्टम मुळे मिळेल.
- यामुळे एसटी बस प्रवाशांसाठी प्रवास सुविधाजनक होईल,अशी अपेक्षा आहे.
एकंदरच एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याने याचा सर्वत्र स्वागत होत आहे.या तांत्रिक सिस्टम आणि प्रवाशांना यामुळे मिळणाऱ्या सुविधा मुळे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल आणि एसटी प्रवास हा आरामदायी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.