यशवंत पालीवाल यांचा सत्कार करताना MLA Madan Bhau Yerawar.

यशवंत पालीवाल यांचा सत्कार करताना MLA Madan Bhau Yerawar.

नेमबाजी स्पर्धेतील यशवंतचे यश युवकांना प्रेरणादायी! – MLA Madan Bhau Yerawar

यवतमाळ. दिनांक ७ डिसेंबर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित नेमबाजी स्पर्धेत यवतमाळच्या ‘शूटर’यशवंत योगेश पालीवाल ने मिळवलेले यश युवकांसाठी प्रेरणादायी आहे अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये युवकांनी सहभागी होऊन यवतमाळ जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे नाव उज्वल करावे, अशा होणाऱ्या सर्व प्रयत्नांना माझे पूर्ण सहकार्य राहील, यशला भविष्यातील यशाची उज्वल कामना करतो असे प्रशंसोदगार माजी मंत्री यवतमाळचे आमदार भाजपा नेते मदनभाऊ येरावार यांनी येथे काढले.

यवतमाळ एमआयडीसी परिसरातील लाईफ ट्रॅप इंडस्ट्रीज येथे आमदार मदन भाऊ येरावार यांच्या हस्ते यशवंत पालीवाल यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आमदार मदन भाऊ येरावार पुढे म्हणाली की, यवतमाळात आर्चरीसाठी (धनुर्विद्या) एक विशेष रेंज उभारण्यात आली असून रायफल प्रशिक्षणासाठी सुद्धा रेंज ऊभारण्याच्या प्रयत्नात आपण आहोत. तरुणांमध्ये आर्चरी, तलवारबाजी आणि रायफल शूटिंग सारख्या धाडसी खेळांमध्ये प्राविण्य मिळविण्याची उर्मी असली पाहिजे.

त्या दृष्टीने यशवंतने मिळवलेले यश कौतुकास्पद आहेअसे मदन भाऊ येरावार म्हणाले. या यावेळी ज्येष्ठ पत्रकार न.मा. जोशी ,लाईफ ट्रॅप ची निर्माती करणारे उद्योजक योगेश आणि कौशल पालीवाल,मंजू धामट मनीष भायल, दुर्गा हरजल ,पूजा मुद्दा ,नंदु पालीवाल, ,रमेश हरजल धन्यवाद प्रतिष्ठित हजर होते. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार न.मा.जोशी यांनी सांगितले की, यशवंतने कधी हातात पिस्तोल घेतली नव्हती पण काही महिन्यांपूर्वी नागपूरला रायफल असोसिएशनचे उपाध्यक्ष उधमसिंग यादव आणि शूटर समरजीत सिंग यादव यांच्या घोरपड येथील आयडियाज मध्ये त्याने एक दिवस रायफल हाती.

घेऊन एक गोळी चालवली होती आणि पहिल्याच प्रयत्नात अचूक नेमबाजी केली होती. तिथेच त्याच्यात बंदुक चालवण्याची इच्छा झाली. इंदूर जवळील महू येथे झालेल्या ऑल इंडिया जी व्ही मावळणकर रायफल स्पर्धेत त्याने अत्यंत मेहनतीने यश मिळविले. बायोटेक्नॉलॉजिस्ट उच्चशिक्षित असलेला चोवीस वर्षीय यशवंत हा स्वभावाने विनम्र असून कोल्हापूरला त्याने प्रसिद्ध शूटर तेजस कुसळे यांच्याकडे रायफल चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

महाराष्ट्र रायफल असोसिएशन मुंबई द्वारा गुजरात मधील आमदाबाद येथे आयोजित पश्चिम विभागीय स्मॉल बोर फ्री रायफलप्रोन शूटिंग चॅम्पियनशिप (रायफल पिस्तूल ) आणि नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया स्पर्धेमध्ये सहभागी होऊन ५५९ चा स्कोर केला होता. एम आर ए चे महासचिव के सुलतान सिंग यांनी प्रमाणपत्र देऊन यश ला गौरविले आहे. विशेष उल्लेखनीय बाब अशी की भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने( भारत सरकारच्या गृहमंत्रालयाशी संलग्न) यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून यशवंत योगेश पालीवाल हा महत्त्वाकांक्षी नेमबाज असून याला बंदूक चालवण्याचे लायसन देण्याबाबत शिफरस केली आहे.

महत्त्वाकांक्षी नेमबाज म्हणजे अशी व्यक्ती ज्याने किमान एक राज्य चॅम्पियनशिप (वर्षातून एकदा आयोजित) किंवा राष्ट्रीय रायफल असोसिएशन आणि/किंवा संबंधित राज्य रायफल असोसिएशनद्वारे मान्यताप्राप्त झोनल चॅम्पियनशिप किंवा राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेत भाग घेतला आहे आणि किमान पात्रता स्कोअर (५४०)प्राप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 8 =