आमदार यांचे कडून शेवटच्या माणसाला गावातील विकास कामांच्या लोकार्पणचा मान.

*बाभुळगाव ता, प्र मोहम्मद अदीब*

बाभूळगाव शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू दिसावे असा आपला प्रयत्न असल्याचे मत राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सतीश मानलवार यांनी व्यक्त केले.
ते महमदपुर येथे श्रीराम मंदिरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. आमदार अशोक उईके यांनी स्वतः लोकार्पण न करता महंमदपूर येथील विविध विकास कामाचे लोकार्पण गावातील रहिवाशी व कोलाम समाजाचे रामदास गाडेकर व सौ गाडेकर या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

हे येथे उल्लेखनीय. महमदपुर गावाला जोडणारा डांबर रस्ता, कोलाम पोळा वरील रस्ता व डांबर रस्ता, सोबतच नालीचे चांगले व दर्जेदार काम झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. डांबर रस्ता अतिशय चांगल्या क्वालिटीचा झाल्याचे यावेळी ग्रामस्थांनी चर्चेदरम्यान सांगितले. सोबतच पुलाचे भूमिपूजन संपन्न झाले. अशीच दर्जेदार कामे यापुढे होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी सभेप्रसंगी व्यक्त केली.

कार्यक्रमाला राळेगाव विधानसभा प्रमुख सतीश मानलवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष नितीन पारडखे, नगरसेवक अनिकेत पोहोकार, माजी उपसभापती हेमंत ठाकरे, संजय राठी, आनंद सोळंके, शाखा अभियंता चौरे, शाखा अभियंता काजी, सरपंच ज्योती सुनील काळे, राजेश देशमुख, चेतना सोळंके, मीना तुरकाने, चैताली काळे, माया सोळंके, योगेश गुल्हाने, भाऊ मानकर, रामदास गाडेकर, सौ. गाडेकर, सुधाकर काळे, शरद सोळंके, राजेंद्र चीचे, भास्कर कोल्हे, राजू कोडे, शेखर ठाकरे, अजय वाकेकर, खुशाल कठाळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.