शादिखानासाठी वाढीव निधी उपलब्ध करणार – आ. Ashok Uike
*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब*
आसेगाव येथे शंकर पटात घारफळ येथील बैलजोडी प्रथम.
अल्पसंख्यांक समाजासाठी शादिखाणा बांधकाम करीता 50लाख रुपये वाढीव निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आमदार Ashok Uike यांनी असेगाव येथे शंखर पटाच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी दिले. तालुक्यातील सावर येथे दि. १५ ते १७ डिसेंबर रोजी तीन दिवस नितीन राठी व राजीक शहा मित्र परिवारच्या वतीने शंखर पटाचे आयोजन करण्यात आले होते.शंकरपटामध्ये अ, क आणि व गावगट असे तीन गट पाडण्यात आले होते.
‘अ’ गटातील पहिले बक्षीस अशोकराव घारफळकर यांच्या बजरंग काशी या बैलजोडीने पटकाविले.’क’ गटातील पहिले बक्षीस अनिश वर्मा वाशीम यांच्या मयुर-सिकंदर या बैलजोडीने पटकावले. याशिवाय ‘अ’ गटातील दुसरे बक्षीस आरीफ लाला फुलसावंगी, तिसरे शिवानी विजय राठोड, चौथा राजिक शाह तर ‘क’ गटातील दुसरे बक्षीस भाऊ जाधव, तिसरे बक्षीस जनार्दन खरासे यांनी पटकावले. गाव गटामध्ये शेख अतिक सावर, शुभम चव्हाण, अजय ढाकूलकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकाविले.
राज्यातील एकूण १६ जिल्ह्यातून १७० बैलजोड्यांनी या शंकरपटात सहभाग घेतला होता यावेळी स्थानिक मुस्लीम समाजबांधवाकडून आमदार डॉ. उईके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. विजेत्यांना आमदार अशोक ऊईके यांच्या हस्ते पारितषिके देण्यात आली. शंकरपटाचे बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानी संतोष राठी, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. अशोक उईके, हेमंत ठाकरे, बाजार समिती संचालक विक्की परडखे, नितीन परडखे, सोनु येंडे, बाभूळगाव न.प.नगरसेवक अनिकेत पोहोकार, शिवसेना यवतमाळ तालुका प्रमुख संजय रंगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रशांत वानखडे, संकेत टोणे उपस्थित होते.