Mirzapur Season 3 : शिव्या पसंत नसेल पण ऐकायला तयार राहा.
Mirzapur Season 3 : शिव्या पसंत नसेल पण ऐकायला तयार राहा.
मिर्झापूर या प्रसिद्ध वेबसिरीजची तिसऱ्या सीझनची सुरुवात याच्या स्ट्रिमिंगपासून झाले आहे.उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागात माफिया व बाहुबली यांच्या मध्ये वर्चस्वाची लढाई व यात राजकीय दखलंदाजीचा मसाला या वेबसिरीज मध्ये आधीच्या दोन सिरीज मध्ये दाखविण्यात आले.यात पारंपरिक बोलीभाषेत शिव्यांचा जसा वापर झाला तसाच किंवा त्यापेक्षा अधिक शिव्या मिर्जापुरच्या तिसऱ्या सेशन मध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळू शकतात, यात तर आता मंचावरून थेट कवितेच्या स्वरूपात शिव्यांचा धाराप्रवाह वापर आहे,ही गोष्ट या वेबसिरीज चा प्रोमो व स्ट्रीमिंग पाहता लक्षात येत आहे.
पूर्वांचल बोलीभाषेत डायलॉग व भरपूर शिव्या मिर्झापूर सीजन थ्री
मिर्झापूर असो वा अन्य कोणतीही वेबसिरीज असो यात थ्रिलर व हिंदी बेल्टमधील बोलीभाषेत आकर्षकपणे अभिनय करून डायलॉग व यात शिव्यांचा खुलेआम वापर केल्या जातो. डायलॉग सोबत शिव्या हा ट्रेंड आहे आणि माफिया व राजकीय शक्तीचा मिलन प्रेक्षकांना अशा वेब सिरीज पाहताना थक्क करून सोडतो.पण प्रश्न हा आहे की,अश्या वेबसिरीज मध्ये सेंसार बोर्ड अखेर निर्देशकाना शिव्यांचा धारा प्रवाह वापर का करू देतो? हा अध्ययनाचा विषय बनला आहे, मात्र प्रेक्षकांनाही अश्या वेब सिरीज मध्ये थ्रिलर सस्पेन्स व पारंपरिक बोलीभाषेत डायलॉग बोलताना अभिनेता चरित्र अभिनेत्याकडून देण्यात येणाऱ्या शिव्या पसंत पडतात, असा अनुभव आता पर्यंत वेब सिरीज बनविणाऱ्या डायरेक्टर्स बहुतेक आला आहे,त्यामुळेच आता मिर्झापूर- 3 सेशनमध्ये अनोख्या व नवीन शिव्या काही प्रसंगात अपग्रेड वर्जन मध्ये व थेट राजकीय नेत्यांवर देण्यात आल्या आहे,ते ही कवितेच्या स्वरूपात.
प्रसिद्ध क्राईम-थ्रिलर वेब सिरीज ‘मिर्झापूर’चा तिसरा सीझन या आठवड्यात स्ट्रिमिंगसाठी सज्ज आहे. बाहुबल ने बदला घेणे वा सत्ता हस्तगत करण्याची कहाणी 2018 मध्ये मिर्झापूर या सिरिजच्या पहिल्या सीझनपासून सुरू झाली. यात पूर्वांचल माफिया म्हणून पंकज त्रिपाठी सारखे नावाजलेले अभिनेत्याचा नाव युवक वर्गात व घराघरात पोहोचले.नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ सोबतच या शो मुळे देशात माफिया-आधारित स्टोरी वर आधारित वेब सीरिजची लाट आणली होती.आता ‘मिर्झापूर 3’ पाहण्यासाठी तयार आहात,तर याचा प्रोमो पाहताच यात ज्या शिव्या एकाव्यास मिळतात त्याआधी या सीझनबद्दल सर्व काही जाणून घ्या. सेक्रेटरी जितेंद्र कुमार,कालीन ते गुड्डू भैय्याच्या सिंहासनावर जाण्यापर्यंतचे सर्व तपशील यात मिळेल.