Microsoft Jobs : दिवसाला फक्त 4 तास काम अन् 2 कोटी वार्षिक वेतन ड्रीम जॉब होत आहे सोशल मीडियावर ट्रेण्ड.
Microsoft Jobs : दिवसाला फक्त 4 तास काम अन् 2 कोटी वार्षिक वेतन ड्रीम जॉब होत आहे सोशल मीडियावर ट्रेण्ड.
एरवी विविध खाजगी नॅशनल इंटरनॅशनल मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आपल्या कामाच्या तणावाखाली नेहमी वावरताना दिसतात. त्यामुळे आठवड्यात कमी तास खूप मेहनत करून मिळालेला वेळ इतर कामात घालून पैसा कमविणे आणि कुटुंबाला वेळ देणे यासाठी सर्वच वर्गातील एम्प्लॉईज ड्रीम जॉब बाबत विचार करताना दिसतात. आता मायक्रोसॉफ्ट सारख्या आंतरराष्ट्रीय टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या एम्प्लॉईज ना कमी तासात मिळणारा कोट्यावधींचा भरपूर वार्षिक सॅलरी पॅकेज पाहता करोडो लोकांना ड्रीम जॉब कसा असावा हा स्वप्नसुद्धा पडत आहे आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडून शिकायला आणि पाहायला मिळत आहे.मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्पलोयी युवकांची कमी तासाच्या काम आणि वार्षिक पॅकेज जाणून घेतल्यानंतर युवा या कंपनीच्या नोकरीला ‘ड्रीम जॉब’ म्हणत आहेत.सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्ट मधील नोकरीचे तास आणि वेतन पॅकेज समोर आल्यानंतर हजारो लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
कशा आहेत प्रतिक्रिया.
या संदर्भात @ronawang नाव असलेल्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म × वर लिहिले की, मी माझ्या मित्रासोबत बोलत आहे, जो मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करतो.तो आठवड्यातून फक्त 15 ते 20 तास काम करतो आणि उर्वरित वेळ लीग (क्लब,स्पोर्ट्स मधील विविध खेळ) खेळतो आणि त्याला 2 कोटींहून अधिक पगार मिळतो. सोशल मीडियावर ही पोस्ट खूप व्हायरल झाली आणि आतापर्यंत याला 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
चार तास कामाचा पगार पाहून लोक हैराण.
आधी शासकीय दफ्तरी आणि खाजगी कंपन्यांच्या ऑफिसमध्ये आपले काम पूर्ण करण्यासाठी कार्यालयात अधिक वेळ घालविणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे सर्व लोक आजार आणि पाहत होते. पण हळूहळू कार्यालयामध्ये कामात व्यस्त असल्याचा हा कल्चर संपुष्टात येत आहे.आता आठवड्यातील कमी तासांमध्ये जास्त कामाने वार्षिक पॅकेज अधिक मिळावा यावर सर्वांचे आग्रह असतील.आता आठवड्यातील वर्किंग डे मध्ये दिवसाला केवळ चार तास काम करून चांगले आर्थिक पॅकेज मिळविणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांची उदाहरणे समोर येत असल्याने समाज माध्यमांमध्ये हा आहेराणीचा विषय आहे. याबाबत सोशल प्लॅटफॉर्मवर एका युजरने लिहिलेला पोस्ट चर्चेत आहे, हा युजर म्हणतो जर एखादी व्यक्ती आपल्या कार्यालयात आठवड्यातील वर्किंग डे मध्ये 40 तासाचे काम फक्त 20 तासांत करू शकते, तर कोणाला त्यात काय अडचण आहे?
मायक्रोसॉफ्ट एम्पलाईजना कमी तासात अधिक पगार अन् अनेक हैराण.
मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणाऱ्या एम्प्लॉईज ना कमी तास काम केल्यानंतर भरपूर पगार मिळत असल्याने आता सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्टचा कर्मचाऱ्यांचा पॅकेज हा चर्चेचा विषय झाला असून सोशल प्लॅटफॉर्मवर हा ट्रेंडिंग वर आहे. एक्स वर एका युजरने लिहिले आहे, चांगल्या कंपन्या चांगल्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी विविध सुविधा देतात. तर इतर एकाने लिहिले, असा पॅकेज मिळविण्यासाठी आधी कंपनीचा विश्वास जिंकावा लागतो. जर तुम्ही विश्वास जिंकण्यात यशस्वी झालात तर एका महिन्यात खूप कमी वेळ काम करूनसुद्धा तुम्हीपण चांगली कमाई करू शकता.तर एका युजरने गमतीशीर पद्धतीने यावर कमेंट केले आहे, लोक मायक्रोसॉफ्टमध्ये आठवड्यातून 15 तास काम करतात, वर्किंग अवर्सनंतर दिवसभर ते लीग खेळतात आणि यातून 300 डॉलर कमावतात.मी 50 तास काम करत आहे त्यामुळे मला जीम ला जाण्यासाठीही वेळ मिळत नाही, यात माझी काय चूक होतोय?. याव्यतिरिक्त सर्वसामान्य लोक आणि इतर इंटरनॅशनल मल्टी नॅशनल कंपनीचे कर्मचारी सुद्धा मायक्रोसॉफ्टच नव्हे तर गुगलच्याही वर्क कल्चरचे कौतुक करताना दिसतात. यावर इतर कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने यासंबंधी एक व्हिडिओही शेअर केला आहे. आता वरील कंपन्यांच्या सुविधा पाहून अनेक कर्मचारी आणि जॉब शोधणारे युवक अशा कंपनीत काम करण्यात उत्सुकता दाखवू लागले आहे.