MH-SET Exam 2025 Registration : सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी MH-SET Exam नोटिफिकेशन जाहीर ! जाणून घ्या, MH-SET परीक्षा दिनांक आणि अर्जासाठी शेवटची तारीख !

MH-SET Exam 2025 Registration : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राज्यातील 40 वी MH-SET 2025 परीक्षेचे आयोजन करण्यात येत असून,सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ही राज्यस्तरीय पात्रता परीक्षा तारीख घोषित करण्यात आली आहे.या एसईटी परीक्षेची अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

(MH- SET Exam 2025)महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा यूजीसी मान्यता प्राप्त पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सदर ही राज्यस्तरीय सीईटी परीक्षा यावर्षी 15 जून 2025 रोजी होणार आहे.{SET Exam2025 For Asst. Professor}

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

हे असेल परीक्षा केंद्रांचे जिल्हे.

राज्यातील पुणे,कोल्हापूर,मुंबई,सोलापूर, नाशिकधुळे जळगाव,अहिल्यानगर,छत्रपती संभाजी नगर,नांदेड अमरावती, नागपूर, गडचिरोली,चंद्रपूर,परभणी,नंदुरबार रत्नागिरी,आणि गोवा येथील पणजी या परीक्षा केंद्रांवरून 15 जून रोजी MH – CET परीक्षा होणार आहे.(Maharashtra State Eligibility Test For Assistant Professor)

ही आहे सेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख.

पुणे विद्यापीठाकडून आयोजित SET Exam 2025 साठी notification आणि एप्लीकेशन सुरू होण्याची दिनांक नुकतीच घोषित केली आहे.यानुसार 15 जून 2925 रोजी ही SET परीक्षा होणार आहे.

  • 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून या सीईटी परीक्षेसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू होईल.
  • SET परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2025 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत असेल.
  • ही सेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे कडून विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट https://setexam.unipune.ac.in/ वर ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • ऑनलाइन अर्ज करताना परीक्षार्थींना विहित नमुन्यातच अर्ज करावयाचा आहे.
  • विद्यापीठाची वेबसाईट वर अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून 13 मार्च 2025 पर्यंत सुरू असेल.

या सेट परीक्षेसाठी अर्ज करताना जर विलंब झाल्यास अशा उमेदवार परीक्षार्थीला 500 रुपये विलंब शुल्क सहित अर्ज करण्यासाठी दिनांक हा 24 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 31 मार्च 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ असेल. यानंतर प्रवेश अर्ज प्रक्रिया बंद होईल.

MH-SET Exam 2025 Registration : अर्जदारांसाठी महत्वाच्या सूचना.

सीईटी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना, वरील वेबसाईटवर दिलेल्या नमुन्यात आपला अर्ज ऑनलाईन सिस्टमने अचूक भरावा लागेल.Set परीक्षा साठी अर्ज केल्यानंतर याची छापील प्रत डाऊनलोड करून ती जतन करून ठेवावी.डाउनलोड केलेली ही अर्जाची प्रत परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर किंवा सीईटी विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडे ना पाठवता स्वतः ठेवावी अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

इतके असेल सेट परीक्षेसाठी परीक्षा शुल्क.

महाराष्ट्रात 15 जून 2025 रोजी पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी आयोजित होणारी सीईटी परीक्षा प्रक्रिया दरम्यान परीक्षार्थींनी अर्ज करताना परीक्षा शुल्क अदा करावा लागेल.

  • या परीक्षेत अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थींना अर्ज प्रक्रिया शुल्क सह 800 रुपये
  • इतर मागासवर्गीय भटक्या तसेच विमुक्त जाती-जमाती/सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गातील
    (फक्त उन्नत आणि प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी)( For Non Creamy Layers)/ खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक {EWS}, विकलांग प्रवर्ग {PWD}/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/तृतीयपंथी/अनाथ वर्गातील परीक्षार्थींना (प्रक्रिया शुल्कासह) 650 /- रुपये परीक्षा शुल्क अदा करावा लागेल.

अर्जदार सेट परीक्षार्थी आपला परीक्षा शुल्क क्रेडिट डेबिट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे भरू शकतील विद्यार्थ्यांनी ऑनलाइनरित्या सेट परीक्षेसाठी आज केल्यानंतर त्या अर्जाची एक छापील प्रत परीक्षा होईपर्यंत स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.सोबतच सेट परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या परीक्षार्थींनी परीक्षा शुल्क क्रेडिट डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग द्वारे अदा केल्यानंतर, याबाबतचा पुरावा म्हणून त्याची रिसिप्ट डाऊनलोड करून जतन करून ठेवावी लागेल.

MH-SET 2025परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींसाठी महत्त्वाची सूचना जारी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी आयोजित ही SET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाचा सूचना जारी करण्यात आले आहे.

उन्नत आणि प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्न आर्थिक मर्यादेसंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय संदर्भ पहावा.

सोबतच या संदर्भात सेट परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील परीक्षार्थींसाठी गोवा सरकारकडून सेट परीक्षेसाठी निर्गमित अधिकृत शासन निर्णय बंधनकारक असतील,अशी माहिती देण्यात आली आहे.

अंदाजा नुसार एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षार्थी यादी प्रसिद्ध होणार.

सेट परीक्षेसाठी अर्ज करणारे आणि यासाठी भरलेल्या परीक्षार्थींची यादी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट https://setexam.unipune.ac.in/ वर एका अंदाजा नुसार एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होऊ शकते.परीक्षा अर्ज आणि शुल्क भरून सुद्धा या यादीत ज्या विद्यार्थ्यांचे नाव समाविष्ट नसतील,अशा विद्यार्थ्यांनी त्यांनी केलेल्या MH- SET Exam 2025 अर्जाची डाऊनलोड केलेली प्रत,शुल्क अदा केल्याचे पुरावा म्हणून डाऊनलोड केलेली प्रत, विद्यापीठाच्या खालील दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवावी लागेल.

set-support@pun.unipune.ac.in

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ही सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी आयोजित होणार असून, इच्छुक उमेदवार परीक्षार्थी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या SET परीक्षेचे नोटिफिकेशन पाहू शकतात.

https://setexam.unipune.ac.in/SET_2024/SET_Marathi_Advertisement.pdf

जर परीक्षार्थी एखाद्या विषयात यापूर्वी झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण आणि पदासाठी संबंधित विषयासाठी पात्र असेल तर,अशा विद्यार्थ्याला परत त्याच विषयात पुन्हा ही सेट परीक्षा 2025 देता येणार नाही,असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one + twenty =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.