मौजे कोलंबी येथील शेतकरी गोपाळ पोतलवाड यांच्या राहत्या घरातील 15 किंवटल कापूस व वीस हजार रोख रक्कम जळून खाक.

मौजे कोलंबी येथील शेतकरी गोपाळ पोतलवाड यांच्या राहत्या घरातील 15 किंवटल कापूस व वीस हजार रोख रक्कम जळून खाक.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर*

दि.21/12/2023 रोजी मौजे कोलंबी येथील शेतकरी गोपाळ पोतलवाड यांच्या घरातील वेचून आणुन ठेवलेल्या कापूस व कपाटातील दाग दागिने,कपडे, आवश्यक कागदपत्रे व वीस हजार रोख रक्कम शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक झाली.शेतकरी व त्यांची पत्नी शेतात गेली असता दुपारी 2 वाजता अचानक घरातून धूर येऊ लागला आजूबाजीला असलेल्या एका वृद्ध महिलेला हे समजले असता तिने गावातील एका व्यक्तीस सांगून शेतकऱ्याला फोन करण्यास सांगितले शेतकरी घरापर्यंत येई पर्यंत कापसाचे पूर्ण नुकसान झाले होते.

अगोदरच शेतकरी कापसाला भाव मिळत नाही म्हणून परेशान व अतिवृष्टीला कंटाळालेला असताना त्यातच या शेतकऱ्याचे वर्षभराचे घरी आणुन ठेवलेल्या कापसाचे व रक्कमचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तरी या गोष्टीचे गांभीर्य घेऊन शासन स्थरावरून काय मदत मिळेल याकडे गावाकऱ्याचे लक्ष आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + seven =