Maruti Suzuki Fronx Car : वाहनांसाठी इंधन म्हणून पेट्रोल डिझेल वापरण्यापेक्षा इतर इंधन पर्यायांच्या वापरावर भर दिला जात आहे.यात पर्यावरण पूरक सीएनजी आणि इलेक्ट्रिक बॅटरी इंधन वर जोर देण्यात येत आहे.दरम्यान यात आता दुसऱ्या इंधन पर्यायासाठीही फोकस करण्यात येत आहे.
त्यामुळे आता वरील सर्व इंधन पर्यायांपेक्षा खूप स्वस्त आणि फायदेशीर इंधन निर्माण करण्यासाठी भारतात प्रयत्न होत आहे. यात मारुती सुझुकी ऑटोमोबाईल्स कंपनीने शेणापासून (गोबर खत) तयार झालेल्या गॅस इंधनावर चालणारी कार बनविली आहे.
Maruti Powered Fronx सीएनजी आणि इलेक्ट्रिक ऐवजी मारुतीची ही कार शेणाने बनविलेल्या गॅसवर चालणारी आहे.
काय आहे बायोमिथेन गॅस (गोबर गॅस)आणि त्याचे फायदे?
अगदी कुठेही उपलब्ध होणाऱ्या गाय म्हशीच्या गोबरापासून विशिष्ट प्रक्रिया करून बायोमिथेन गॅस तयार होते.यापूर्वी भारतात बायोमिथेन गॅस प्लांटला मोठ्या प्रमाणात शहरी आणि ग्रामीण भागात वापरात आणल्या गेले आहे.
आता बायोमिथिन गॅस इंधन वाहनांसाठी अगदी स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून समोर आला आहे.विविध इंधन वर चालणाऱ्या वाहनांमध्ये बायोमिथेन गॅस वापरण्याचे खूप फायदे मिळणार आहेत.
असे इंधन वापरणारी वाहने चालवताना पर्यावरणाला प्रदूषणाचा धोखा टळतो,कारण हे गॅस कमी नायट्रस ऑक्साईड (NOx) आणि पार्टिक्युलेट मॅटर (PM) उत्सर्जन देखील करतात.
अनेक पर्यायी कमी कार्बन इंधनांच्या तुलनेत बायोमिथेन गॅस हा ग्रीन एनर्जी या श्रेणीत येते.आणि एकदम स्वस्त इंधन पर्याय आहे. यामुळे आता सरकारी या इंधन पर्यायावर चालणाऱ्या सर्व प्रकारचे वाहनांना चालना देणार आहे.
Maruti Suzuki Fronx Car ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांचे लक्ष वेधले.
भारतात सुरू असलेल्या मोबिलिटी ग्लोबल एक्स 2025 मध्ये मारुती कंपनीने शेणपासून तयार झालेल्या गॅस इंधन वर चालणारी अशीच एक कार सादर केली. गोबर गॅस वर चालणारी या मारुती कारचे मारुती पॉवर्ड फ्रोंक्स Maruti Powered Fronx हे नाव सध्या देण्यात आले आहे.
गोबर गॅस इंधनाचा यापूर्वी भारतात स्वयंपाक आणि इतर काही उद्योगांसाठी वापर होत होता.आता यावर वाहने चालविण्यासाठी या गॅस इंधनचा वापर होण्याची शक्यता वाढली आहे.मारुती सुझुकी कंपनीने ही आपली नवीन कार शोकेस या ऑटो एक्सपो मध्ये सादर करताच,याकडे ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांचे सुद्धा लक्ष आकर्षित झाले आहे.
Compressed Biomethane Gas कॉन्सेप्ट डेव्हलप करण्याची सुरुवात
कॉम्प्रेस बायोमिथेन गॅस Compressed Bio methane Gas वर चालणारी मारुतीची ही Maruti Powered Fronx ही गोबर पासून निर्मित झालेल्या बायोमेथीन गॅसवर चालू शकते.कंपनीने यासाठी विशेष असा सीबीजी(Compressed Biomethane Gas )कॉन्सेप्ट डेव्हलप करण्याची सुरुवात केलेली आहे.
उल्लेखनीय म्हणजे मारुती कंपनीने यापूर्वीही बायोमिथेन गॅस वर चालणारी कार बायोमिथेन गॅस कन्सेप्ट सह यापूर्वी सादर केली होती.देशात मागील ऑटो एक्सपो मध्ये या कंपनीने पहिली अशी ब्रेजा या कारला कॉम्प्रेस्ड बायोमेथेन गॅस कॉन्सेप्ट मध्ये सादर केले होते.
दरम्यान मारुती कंपनीने आता या पॉवर कारचे ऑफिशियल लॉन्चिंग केव्हा होणार,या संदर्भात सध्या माहिती दिलेली नाही.मात्र या गॅस पर्यायावर चालणारी ही कार लवकरच मार्केटमध्ये लॉन्च होईल अशी शक्यता ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यक्त होत आहे.