क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा Martyrdom Day.
राळेगांव: २१ आॅक्टोबर क्रांतीविर बाबूराव पुल्लसूर शेडमाके यांच्या Martyrdom Day निमित्त राळेगांव येथे सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम गृहा च्या बाजूला असलेल्या क्रांतीविर बाबूराव शेडमाके यांच्या तैलचित्रा जवळ समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तीरू रविंद्र शेराम, नगराध्यक्ष नगर पंचायत राळेगांव प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रांता अध्यक्ष तिरू बळवंत मडावी.
आदिवासी समाज सेवक नानाजी कोवे,राजेश्वर मडावी, सेवानिवृत्त तलाठी रामचंद्र मेश्राम, अरविंद केराम, सेवानिवृत्त तहसीलदार मधुकर गेडाम, गणेश कूडमेथ या वेळी क्रांतीविर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना रेखाताई कुमरे यांनी इतिहासात विदर्भातील क्रांतीविर कसे दुर्लक्षित राहिले याचे सविस्तर विवेचन केले.तसेच अरविंद केराम, यांनी विर बाबूराव शेडमाके यांच्या जिवनातील काही.
स्मृतीला उजाळा देत इंग्रजांच्या विरोधात बाबूराव शेडमाके यांच्या कार्याचे किती मोठे योगदान होते. हे आपले इतिहासकार कसे विसरले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पायवाट आदिवासी क्रांतीकारांनी तयार केली. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.परंतु या क्रांतीविराची प्रस्तापित इतिहासकारांनी नोंद घेतली नाही,. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत विर बाबूराव शेडमाके च्या ह्रदयात निर्माण झाली व त्यांनी जंगोम दलाची स्थापना केली.
त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या अनेक स्थळांवर हल्ला करून विजय मिळविला. याचाच परिणाम इंग्रजांनी कपट नीतीचा अवलंब करून बाबूराव शेडमाके यांना पकडण्यात आले व आज दि २१ ऑक्टोबर १८५८ रोजी चंद्रपूर येथे पिंपळाच्या झाडाच्या फांद्यीला फाशी देण्यात आली. अशा या महामानवाचाअंत करण्यात आला. असे महान क्रांतीकारकांना इतिहासकारांनी दुर्लक्षित केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित परचाके यांनी केले. व आभार प्रदर्शन सौ.स्वाती मेश्राम, यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित मारोती उईके, मारोतराव शेडमाके, सुरेखा पेद्रांम, विठ्ठल मरसकोल्हे, वाल्मिक मेश्राम, किशोर वउमरतकर, शंकर मडावी, अनिल वाघाचे, प्रदिप उईके, मनिष गेडाम, सुजल गेडाम, गजानन सिडाम,चंद्रप्रभा मेश्राम, शितल कुळसंगे,गजानन तुमराम, अंकुश कुळसंगे, गणेश सुरपाम,गजानन मेश्राम, प्रकाश धुर्वे, आयुष धमड,श्रीराम गावंडे, गणेश येडमे, होते.