Marriage Registration Office: मुलाच्या लग्नाची ऑनलाइन नोटीस निघाली, तुम्हाला माहिती आहे काय?

Marriage Registration Office: मुलाच्या लग्नाची ऑनलाइन नोटीस निघाली, तुम्हाला माहिती आहे काय?

वर्षभरात अनेकांनी पार पाडले विवाह: हाडपकातही प्रेमीयुगुल विवाह बंधनात.

यवतमाळ: Marriage Registration Office पूर्वी ऑफलाइन पद्धतीने नोटीस बजावली जात होती. आता मुलांची आणि मुलींच्या विवाहाची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. यामुळे मुली आणि मुलांनी ऑनलाइन विवाह नोंदणीसाठी नोटीस बजावण्याची प्रक्रिया अधिकच सोपी झाली आहे. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमुळे विवाह करणे सोपे झाले आहे.

यामुळे भविष्यात पालकांना आपल्या पाल्याप्रती अधिक सजग व्हावे लागणार आहे. विवाह नोंदणी कार्यालयात मुला- मुलींच्या नोंदणीला कायदेशीर परवानगी दिली जाते. यासाठी दोघेही सज्ञान असणे आवश्यक आहे. पारंपरिक विवाह पद्धतीमध्ये अशा नोंदी अपेक्षित आहेत.

नोंदणी कार्यालयात नऊ महिन्यांत ५०० विवाह.

विवाह नोंदणी कार्यालयात गत नऊ महिन्यात ५०० जोडप्यांनी आपला विवाह पार पाडला आहे. या प्रकारामध्ये पारंपरिक विवाहासोबत प्रेमविवाहदेखील पार पडले आहेत. याची संख्या दिवाळीनंतर वाढेल.

सर्वच महिन्यांत विवाहाच्या नोंदी.

विवाह नोंदणी कार्यालयात दररोज विवाहाची नोंदणी आणि नोटीस याबाबतची प्रक्रिया पार पडते. उन्हाळ्यात, शुभमुहूर्तावर आणि नोटीस कालावधी संपल्यानंतर अशा पद्धतीच्या नोंदणी त्यात घेतल्या जातात. एप्रिल, मे, जून आणि दसरा, दिवाळीच्या कालावधीत विवाह नोंदणी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

दिवाळीनंतर वाढणार गर्दी.

दिवाळीनंतर शुभमंगल पार पाडण्यासाठी अनेक तिथी आहेत. ३० दिवसांच्या नोटीस पिरेडनंतर पुढील ९० दिवसात योग्य तिथीवर ऑनलाइन पद्धतीने लग्न पार पाडता येणार आहे.

पितृपक्षातही प्रेमजिवांचा पुढाकार.

नव्या विचारात आणि नव्या युगात वावरणाच्या प्रेमीयुगलांनी हाडपक्षकाळातही आपला लग्न सोहळा पार पाडला आहे. या कालावधीत १५ जोडप्यांनी आपला विवाह पार पाडला आहे.

विवाह नोंदणीसाठी खासगी नोंदणीदाराकडे मोठी गर्दी.

विवाह नोंदणीची प्रक्रिया खाजगी नोंदणीधारकाकडून करता येते. मात्र, यासाठी मोठी रक्कम वकिलाकडून आकारली जाते. ही रक्कम देण्यासाठी नवोदित जोडपे तयार असतात. खासगी नोंदणीदाराकडे नोंदणी केल्यामुळे संपूर्ण वेळ वाचतो. कुणाला त्याचे गुपितही कळत नाही. यामुळे अशा ठिकाणी विवाहाची नोंदणी करण्यासाठी मोठी गर्दी असते.

ऑनलाइन माहिती घेता येणार.

पालकांना विवाह नोंदणी कार्यालयात कुणी लग्नासाठी नोटीस बजावली यासंदर्भातील माहिती घेता येणार आहे. त्याकरिता पालकांनी सदैव जागरूक असणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 2 =