Marathi language पंधरवडा निमित्त काव्यवाचन स्पर्धा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

बोरी अरब : स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय बोरी अरब येथे मराठी भाषा पंधरवडा निमित्त Marathi language व वांडमय मंडळाच्या वतीने काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ.विजय खोब्रागडे व वर्हाडी कवी प्रा . क.स.राठोड, प्रा. आकाश सूर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप खूपसे हे उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या स्पर्धेत एकूण ९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामध्ये कू. प्रीती गायकवाड, कु. आरती खंदारे, कु. अनिषा महल्ले, कु. अश्विनी तायडे, कु. ज्वाला खोब्रागडे, कु. श्वेता खांझोडे इत्यादी. आपल्या मार्गदर्शन पर भाषणात प्रा . क . स. राठोड, प्रा. डॉ.खोब्रागडे सर व प्रा. आकाश सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना काव्यावाचानाची गोडी निर्माण व्हावी या करीता आपल्या खुमासदार शैलीत काव्यवाचन सादर केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. खूपसे सर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाकरिता अशाप्रकारच्या स्पर्धेत सहभाग नोडविला पाहिजे असे आवाहन केले.

तसेच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. प्रीती गायकवाड हिने तर द्वितीय क्रमांक कु. ज्वाला खोब्रागडे हिने प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. नंदकुमार भाकरे व प्रा. आकाश सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. ज्वाला खोब्रागडे हिने केले तर आभार नयन भोयर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मराठी भाषा वांडमय मंडळ सदस्य कु. संजीवनी तिजारे, आश्विन इंगोले, नयन भोयर, पवन चावत, कैलास टेकाम, सुमित खरडे, सार्थक भडके, मनोहर रणमले या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

one × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.