Yavatmal | मराठ्यांचा योद्धा Jarange Patil आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार Haribhau Rathod यांची ५,डिसेंबर रोजी Pusad येथे भेट व चर्चा.
मराठ्यांचा योद्धा Jarange Patil आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार Haribhau Rathod यांची ५,डिसेंबर रोजी Pusad येथे भेट व चर्चा.
मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, एकमेकांच्या समोर भारत- पाकिस्तान सारखी लढाईची परिस्थिती आपण डोळ्यांनी बघतो आहोत, एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप जोकरपणे चालू आहे ,कधी ठिणगी पडेल आणि वणवा पेटेल ,याचा काही नेम नाही, पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लागेल अशी परिस्थिती निर्माण आहे.
या परिस्थितीत माजी खासदार, ओबीसी ज्येष्ठ नेते, आरक्षणाचे अभ्यासक, हरिभाऊ राठोड यांनी पुढाकार घेऊन संभाजी महाराज छत्रपती यांच्याबरोबर विस्कृत चर्चा गेल्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण, प्रतिष्ठान मुंबई, येथे केली असून राठोड यांचा फार्मूला जवळपास महाराजांना मान्य आहे. मराठा समाजाचे समन्वय योगेश केदार, धनंजय पाटील, शिंदे, ओबीसींचे नेते बालाजी शिंदे, सोमनाथ काशीद ,डॉ. पी. बी कुंभार, बाळासाहेब पांचाळ, अरुण शिंपी, या मान्यवरां मध्ये समंजस चर्चा झाली आहे. आणि ९०ते ९५ टक्के हरिभाऊ राठोड यांनी दोन्ही बाजूची समाधान केले आहे.
पुढील बैठक लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर लागेल असा विश्वास आहे ,संभाजी महाराज छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना मागील आठवड्यात पत्र लिहिले होते, आणि बैठकीची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनुसार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिस्ट मंडळाबरोबर बैठक लागेल आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन बैठकीची तारीख निश्चित केली जाईल असे समजले आहे.
योगायोगाने ५डिसेंबर २०२३ रोजी मनोज जरांगे पाटील यांची संध्याकाळी पुसद येथे सभा आहे आणि त्या दिवशी दुपारी पुसद जवळ मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्म गावी गहुली येथे बंजारा समाजाची सभा आहे, ५ डिसेंबर ते २२ डिसेंबर ‘लदेणी रथ यात्रेचा’ शुभारंभ या ठिकाणी होणार आहे. त्या दिवशी मनोज जरांगे पाटील आणि हरिभाऊ राठोड यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
दोन्ही समाजामध्ये सामंजस्याने आरक्षणाचा प्रश्न आणि तिढा कसा सुटेल याबद्दल चर्चा होईल, दोन्ही समाजामध्ये बंधूभाव निर्माण करून, शांतता प्रस्थापित करण्याकरिता आणि राज्यातील कायद्या व सुव्यवस्था कशी राखली जाईल याकरिता रोड मॅप तयार करण्यात येईल, अशी माहिती ओबीसींचे जेष्ठनेते, आरक्षण अभ्यासक /माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली.