हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे Manoj Jarange Patil यांचा 12 तारखेला संवाद दौरा.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे Manoj Jarange Patil यांचा 12 तारखेला संवाद दौरा.

*जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर*

क्रांतीसुर्य मराठा योद्धा Manoj Jarange Patil हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथे बारा मार्च रोजी संवाद दौऱ्यानिमित्त मराठा समाजाशी संवाद साधणार आहे मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील हे दिनांक 12 मार्च रोजी हिंगोली जिल्हा वसमत तालुक्यात दौऱ्यावर येणार असून वसमत शहरातील कृष्ण गार्डन मंगल कार्यालय परभणी रोड वसमत येथे सकाळी नऊ वाजता त्यांची संवाद बैठक आहे.

यानिमित्त वसमत शहर सह तालुक्यामध्ये जय्त तयारी करण्यात आली असून या बैठकीसाठी जवळपास एका लाखाच्या वर मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे शहरातील जिंतूर फाटा येथून त्यांची भव्य मिरवणूक निघून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अश्रूढ पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात होणार आहे.

.तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला ही पुष्पहार अर्पण करून परभणी रोड येथील कृष्ण मंगल कार्यालय येथे त्यांचे स्वागत आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण आणि सगळे सोयऱ्याच्या कायद्यात रूपांतर करण्याबाबतच्या विषयावर चर्चा करण्यात करण्यासाठी म्हणून मनोज जरांगे पाटील हे वसमत दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या स्वागतासाठी वसमत तालुक्यातील सज्ज झाला असून ठीक ठिकाणी त्यांचे स्वागतही होणार असल्याची माहिती आहे त्यासाठी सकळ मराठा समाजाचा परिश्रम घेत आहे आज शहरातील कृष्ण मंगल कार्यालय येथे बैठक घेण्यात आले असून यामध्ये हिंगोली येथे होत असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा बहिष्कार टाकण्यात आला.

असून या कार्यक्रमाला कोणीही मराठा बांधव जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या आदेश मराठा बांधवांना देण्यात आले आहेत तसेच दिनांक 10 मार्च रोजी वसमत येथे होणाऱ्या कार्यक्रमालाही न जाण्याचा निर्णय यावेळी मराठा समाजाने केला तसेच ाजकीय पुढार्‍यांना यापुढे गाव बंदी असल्याचे त्यांनी जाहीर केले यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ुढार्‍यांना गाव बंदी करण्याचा निर्णय यावेळी सकल मराठा समाजाने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + 2 =