मनोज जरांगे यांच्या मागणीला यश आल्याने नरसी चौकात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा.

मनोज जरांगे यांच्या मागणीला यश आल्याने नरसी चौकात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*

संघर्षे योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या व समस्त मराठा समाज बांधवांच्या मागणीला यश आल्याबद्दल मराठा समाजाच्यावतीने नरसी येथील चौकात जल्लोष साजरा करण्यात आला.या वेळी जय भवानी जय शिवराय अस्या घोषणा ही देण्यात आल्या.

शासनाने अध्यादेश काढून महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ देण्याचे महाराष्ट्र शा सन राजपत्र च्या माध्यमातून लेखी निर्णय घेतलेला आहे गोरगरीब मराठा विद्यार्थ्यांना व सुशिक्षित बेरोजगार गरीब बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे त्याबद्दल मराठा संघर्ष योद्धा मा जरांगे पाटील यांची एकनिष्ठता ,सामाजिक बांधिलकी, साधेपणा ,चिकित्सक अभ्यास, मोजकेच बोलणे ,टीका करांना खेळाडू वृत्तीने उत्तर देणे , लाखो मराठा बांधवांचा जनसमुदाय सोबत असून देखील कोणताच मनात अविर्भाव न आणता अतिशय साधेपणाने हिरवा ठेचा व भाकरी रस्त्यात हातावर घेऊन खाणे हे एका क्रांती पेक्षा कमी नाही त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन

महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांच्या प्रगतीची दारे खुले झाले व सर्व मराठा बांधवांना न्याय मिळाल्याबद्दल सर्व बांधवांच्या वतीने नरसी चोकत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे. संघर्षे योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या व समस्त मराठा समाज बांधवांच्या मागणीला यश आल त्याबद्दल मराठा समाजाच्यावतीने नरसी येथील चौकात जल्लोष साजरा करण्यात आला त्यावेळी गुणवंत पाटील शेळगावकर, शिवाजी पाटील लोहगावकर,दिंगाबर पा. कानोले गुरुजी, बाळु पाटील भिलवंडे, दिंगाबर पाटील भिलवंडे,गजानन पाटील कांडाळकर ,गणेश पाटील भिलवंडे, अंकाश डाकोरे,दत्ता जाधव ज्ञानेश्वर डाकोरे,धनाजी भोसले,हे उपस्तित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × three =