दारव्हा: मंदीरातील मुकुट चोरी प्रकरणातील गुन्हा २४ तासाचे आत उघड, आरोपी अटक.

दारव्हा: मंदीरातील मुकुट चोरी प्रकरणातील गुन्हा २४ तासाचे आत उघड, आरोपी अटक.

दारव्हा तालुका प्रतिनिधी : चेतन पवार

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

मुकुट हस्तगत दारव्हा पोलीसांची कामगिरी,फुटेज दाखवतात आरोपी कबुली.

दारव्हा शहर व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या यवतमाळ मार्गावरील चिंतामणी गणपती मंदीरातील मुतीचा चांदीचा मुकुट काल संध्याकाळी ०६/१५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेला ही वार्ता शहर व परिसरात समजताच नागरीकामध्ये एकच खळबळ उडाली होती. या सबंधाने पो.स्टे. दारव्हा येथे अपराध नंबर ९४६/२०२३ भा.द.वि.३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

याबाबत वरिष्ठांना माहीती मिळताच त्यांनी ही बाब जनतेच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्यामुळे तात्काळ चोरट्याचा शोध घेऊन गुन्हां उघडकीस आणन्याचे निर्देश दिले होते. घटना घडताच ठाणेदार पोलीस निरिक्षक विलास कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेत बारकाईने पाहणी केली सहकार्याच्या मदतीने रात्रीच शहरातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले.

पैकी एका सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटा दिसुन आला त्याची माहीती फोटोसह सोशल मिडीयावर देऊन नमुद आरोपीची माहीती देणेबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. आज दुपारी गुप्त बातमीदारांने सदर फोटोशी मिळता जुळता ईसम कारंजा रोडने दारव्हाकडे येत असल्याची माहीती ठाणेदार यांना दिली त्यानी क्षणाचाही विलंब न करता स्टॉफसह माऊली फाटयाजवळ सापळा रचला.

वर्णनातील ईसम भरधाव वेगाने मोटार सायकलने जातांना दिसल्याने त्यावर झडप घालुन त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अमोल लक्ष्मण चव्हाणे वय १९ वर्ष रा. चिखली ता. दारव्हा असे सांगीतले त्यास पो.स्टे.ला आणुन विचारपुस केली असता तो काहीही सांगण्यास तयार नव्हता. मात्र त्यास सीसीटीव्ही फुटेज दाखविताच त्याचे आवसान गळाले व त्याने गुन्हयाची कबुली दिली.

चोरी केलेला गणपतीचा मुकुट भोपापुर फाट्याजवळ लपविला असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी पंचा समक्ष चोरीतील गणपतीचा मुकुट जप्त केला व मंदिर चोरीसारखा संवेदनशील विषयाला अवघ्या २४ तासात पूर्णविराम दिला.

सदरची कारवाई डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, आदित्य मिरखेलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक दारव्हा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र भुते, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवी मोरलेवार, पोलीस नाईक युवराज चव्हाण, ओंकार गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल निखिल इंगोले यांनी केली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + seventeen =