Mahila Samman Savings Certificate : आता लाडकी बहिणींना महिला सन्मान योजनेतून मिळणार पैसे
महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे कोट्यावधी महिलांना सरकारकडून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. तर लाडक्या बहिणींना केंद्रातील मोदी सरकारने आधीच महिलांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी आणलेली जी योजना आहे यातून महिलांना बंपर आर्थिक लाभ रिटर्न स्वरूपात मिळत आहे.या योजनेतून महिलांना 7.5% व्याज उपलब्ध असतो. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी मोदी सरकार कडून “महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट”योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून आर्थिक लाभ घेण्यासाठी महिलांना 31 मार्च 2000 पर्यंत अर्ज करता येईल.
महाराष्ट्रात महिलांसाठी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध आणि यशस्वी ठरली. यातून महिलांना आर्थिक दर महिन्यात आहे जुलै 2024 पासून राज्यात ही योजना सुरू झाल्यानंतर आता पुढील हप्ते महिलांना मिळणार आहे.मात्र यापूर्वी केंद्र सरकारने महिलांसाठी आर्थिक लाभदायक अशी ही महिला सन्मान सेविंग योजना अमलात आणली आहे.यातून महिलांना आर्थिक लाभ घेण्यासाठी रीतसर अर्ज करावा लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने देशातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी 2023 मध्ये “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना” अर्थातच “MSSC” सुरू केली आहे.
या योजनेला देशात आणि महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू होण्यापूर्वी खूप प्रतिसाद मिळताना दिसत होता.या योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आल्यानंतर केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत आपल्या एका निवेदनात म्हटले होते की 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत देशात 43 लाख 30 हजार 129 बँक खाती महिलांनी लाभ घेण्यासाठी उघडली आहे,आणि या योजनेची व्याप्ती संपूर्ण देशभरात राहणार असल्याने देशातील सर्व महिलांना याचा लाभ होणार आहे.
काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना.
केंद्र सरकारकडून एम एस एस सी या योजनेची काही खास वैशिष्ट्ये आहे जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
या योजनेअंतर्गत महिलांना खाते उघडण्यासाठी दहा हजार रुपये किमान आणि दोन लाख रुपये कमाल इतकी रक्कम असेल.याचा कालावधी दोन वर्षाचा राहणार आहे. या योजनेत महिलांना 7.5% वार्षिक आर्थिक रिटर्न मिळतो. या योजनेतून महिलांच्या खात्यात आर्थिक लाभ रक्कम दर महिन्यांनी जमा होते. विशेष म्हणजे या योजनेत देशातील कोणतीही महिला स्वतःचे बँक खाते आपल्या नावाने उघडू शकते. महिलांव्यतिरिक्त कोणतेही मुलगी अल्पवयीन किंवा अविवाहित असेल तर तिच्या कुटुंबातील पालक तिच्या नावावर बँक खाते उघडू शकतात. येत्या 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
असे विड्रॉल करू शकणार बँकेतून या योजनेचे पैसे?.
या योजनेसाठी नियमानुसार अर्ज केल्यानंतर आणि बँक खाते उघडल्यानंतर महिलांना सहा महिन्यानंतर आपल्या खात्यातून रक्कम मिळतो. विशेष म्हणजे लाभार्थी महिला युवतींना आपातकालीन परिस्थितीत आर्थिक मदत मिळावी याचा प्रावधान यात केलेला आहे. याव्यतिरिक खातेदाराचा आकस्मिक मृत्यू झाल्यास किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा हवाला देऊन या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक परतावा मिळतो. या योजनेत दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पूर्ण रक्कम लाभार्थी महिन्यांच्या खात्यात जमा केली जाते.
असे उघडा बँक खाते.
केंद्र सरकारच्या एम एस एस सी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि बँक खाते उघडण्याची प्रक्रिया खूप सोपी ठेवण्यात आली आहे.यासाठी लाभार्थी महिला युवती ठराविक राष्ट्रीयकृत बँक आणि पोस्ट ऑफिसचे खाते उघडू शकते. यासाठी बँकेचे फॉर्म भरताना आधार कार्ड पॅन कार्ड सारखी कागदपत्रे झेरॉक्स स्वरूपात जमा करावी लागते. ज्या महिला युवतींना केंद्राच्या या योजनेचा लाभ घ्यावयाच्या आहे, त्यांच्यासाठी या योजनेच्या माध्यमातून काही राष्ट्रीयकृत बँकांची निवड करण्यात आली आहे,त्यात बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, PAB आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश करण्यात आला आहे.महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले बँक खाते उघडू शकतात.