Mahayuti Internal Rift : महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात “दादा फडणवीसांचा” राज !

Mahayuti Internal Rift : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये एकत्रित असलेले तीन पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये आता दुरावा दिसत आहे.

मात्र हा राजकीय दुरावा महायुतीमध्ये फक्त शिवसेना एकनाथ शिंदे गटासाठी सुरू आहे,तर दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती सरकार चालविताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचीच चालती आहे.यामुळे येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात आणखी मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

महायुतीमध्ये अंतर्गत राजकीय भूकंप, शिवसेना एकनाथ शिंदे गटात फूट पाडल्यानंतर दुसरा राज?

महायुतीमध्ये सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकमेकांच्या जवळ दिसत आहे. आणि महायुतीत भाजप – शिंदे मध्ये अंतर्गत सुरू असल्याची चर्चा आहे.

तर प्रामुख्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खूप जवळीकता साधल्या गेली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीमध्ये अंतर्गत राजकीय भूकंप होऊन शिवसेना एकनाथ शिंदे गटात फूट पाडल्यानंतर महाराष्ट्रात “दादा-फडणवीसांचा” राज असेल ही राजकीय शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात महायुती 0.27 स्थापना झाली तेव्हापासूनच अंतर्गत वाद सुरू आहे.आधी मुख्यमंत्री पद,त्यानंतर कॅबिनेट खाते,आणि पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे मध्ये नाराजी नाट्य दिसला.

यानंतरच अधिक एकनाथ शिंदे यांना सोबत सरकार बनविण्यासाठी बंड पुकारून सोबत घेऊन येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आता जवळीकता वाढली आहे,तर महायुतीत एकनाथ शिंदे यांना दूर लोटला जात असल्याची चर्चा आहे.

यामुळेच आता दोन महिन्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होईल,असा दावा वाल्मीक कराड प्रकरण जोरदारपणे उचलून लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतेच केला आहे.

Mahayuti Internal Rift : निवडणुकीनंतरच शिंदे यांची महायुतीत कोंडी होत असल्याची चर्चा.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद उभारण्याची चर्चा रंगल्या होत्या.यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात नाराजी नाट्य रंगतानाही दिसले.

सर्वात आधी निवडणूक होताच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देणे नाकारण्यात आले,यानंतर शिवसेनेला गृहमंत्री पद सुद्धा मिळाला नाही.

यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पद नेमण्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे गटात वाद होताना दिसला,तर दुसरीकडे सध्या शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांचे आणि ओएसडीच्या नियुक्ती सुद्धा रखडलेले आहेत.

या सर्व बाबी पाहता भाजप आणि एकनाथ शिंदे मध्ये जोरदार मतभेद आणि नाराजी सुरू असल्याचे दिसत आहे.यामुळे आता एकनाथ शिंदे महायुतीत दूर सारल्या जात असल्याची जोरदार शक्यता आहे,आणि यातून एकनाथ शिंदे सुद्धा खूप नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लावला का या मुद्द्यांवर ब्रेक?

  • मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असलेल्या परिवहन मंत्रालय संबंधित एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नेमणूक मध्ये रोडा टाकल्याची चर्चा आहे.
  • तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळातील अनेक फ्लॅगशीप योजनांना सध्या ब्रेक लावला आहे.
  • डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी मधून एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले होते, मात्र त्यांना नंतर समावेश करण्यात आले.
  • पालकमंत्री पदावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही संकेत दिले आहे.

नाराजीनाट्याचा समारोप आता राजकीय भूकंपातून होणार?

आता महायुतीच्या अनेक कार्यक्रमात आणि शासकीय समारंभात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रित येताना दिसत आहेत.या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर असतात.

यामागे वेगवेगळी कारणेही दिली जात आहे. त्यामुळेच आता या नाराजीनाट्याचा समारोप आता राजकीय भूकंपातून होणार असून,येणाऱ्या दीड ते दोन महिन्यात महाराष्ट्रात महायुतीमध्ये अंतर्गत मोठे राजकीय भूकंप होऊन राज्यात फक्त “दादा- फडणविसांचा” राज असेल असे बोलल्या जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

9 − five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.