Mahavitran Lucky Digital Scheme : महावितरण कंपनीकडून आपल्या वीज ग्राहकांसाठी विविध सुविधा आणि योजनांचा लाभ देण्यात येतो आता महावितरण कंपनीकडून वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली आहे.महावितरण कंपनीने या योजनेचे नाव लकी डिजिटल ग्राहक योजना असे ठेवले आहे.
या योजनेसाठी ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या सर्व लघुदाब वीज ग्राहकांना तात्काळ बक्षीस मिळणार आहे.सर्व प्रकारचे लघुदाब ग्राहक या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.1 जानेवारी ते 31 मे 2025 यादरम्यान सलग 3 किंवा तीन पेक्षा जास्त वीज बिल भरून या योजनेची लाभ घेण्याची संधी वीज ग्राहकांना महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.
ग्राहकांसाठी ही योजना सुविधाजनक.
महाराष्ट्रातील महावितरण कंपनीकडून राज्यभरातील सर्व लघुदाब चालू LT Live वीज ग्राहकांसाठी महावितरण लकी डिजिटल लागू राहणार आहे. यात या वीस ग्राहकांनी एक एप्रिल 2024 पूर्वी म्हणजे मागील एका वर्षात 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यान एकही वीज बिल भरला नसेल किंवा ऑनलाईन वीज बिल भरण्याचा पर्याय वापरलेला नसेल अशा ग्राहकांसाठी ही योजना सुविधाजनक आहे.
अशा ग्राहकांना महावितरणच्या या योजनेमार्फत वीज बिल भरल्यास वीज ग्राहकांना स्मार्ट वॉच, स्मार्टफोन यासारखी अनेक आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे दरम्यान वीज ग्राहकांनी या ऑनलाइन पद्धतीने आपले वीज बिल भरून याचा लाभ घेण्याचे आव्हान सुद्धा महावितरणने आपल्या ग्राहकांना केले आहे.
हे मिळेल फायदा.
विविध वेळी महावितरण केंद्राच्या कार्यालयात जाऊन वीज बिल ग्राहकांना भरावे लागते. ऑनलाइन पद्धतीने वीज भरल्यास यादरम्यान ग्राहकांना रांगेत उभे राहून आपला वेळ आणि पैशांची बचत या स्कीम मधून करता येईल. विशेष म्हणजे महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांसाठी यासाठी विशेष संकेतस्थळ आणि स्मार्टफोनमध्ये महावितरण कंपनीने एप्लीकेशन ची सुविधा सुद्धा वीज ग्राहकांना उपलब्ध केलेली आहे.
ऑनलाइन प्रणालीने वीज बिल भरल्यास ध्येय रकमेवर झिरो पॉईंट पंचवीस टक्के डिजिटल विज बिल भरणा सवलत दिली जाते. महावितरण कंपनीने जेव्हापासून राज्यातही योजना सुरू केलेली आहे तेव्हापासून राज्यात सत्ता टक्के येऊन अधिक वीज ग्राहक आपले विज बिल ऑनलाइन पद्धतीने भरत आहेत दरम्यान महावितरण ने ग्राहकांचे हे प्रमाण वाढविण्यासाठी आणि वीस ग्राहकांना जे ऑनलाईन पर्यायासाठी प्रोत्साहन देण्याकरिता लगेच डिजिटल ग्राहक योजना राबविली आहे.
लकी ड्रॉ काढून महावितरण वाटणार बक्षीस.
महावितरण कंपनीकडून लकी ग्राहक डिजिटल स्कीम मधून राज्यातील प्रत्येक विभाग स्तरावर येत्या एप्रिल मे व जून 2025 या तीन महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाइन काढल्या जाणार आहे. या दरम्यान ऑनलाईन विज बिल भरणाऱ्या वीज ग्राहकांना लकी ड्रॉ मध्ये पाच 20 ग्राहक विजेत्यांना स्मार्ट वॉच स्मार्टफोन आणि इतर बक्षीस दिले जाणार आहे.
महावितरणने सुरू केलेल्या या योजने दरम्यान वीज ग्राहकांनी या योजनेच्या कालावधीत ऑनलाइन वीज बिल अदा करताना डेबिट कार्ड,नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड,क्यूआर कोड, एनएसीएच, RTGS आरटीजीएस, NEFT इत्यादी ऑनलाईन पेमेंट पर्याय विज बिल भरणासाठी वापरले असावे.
या लकी ड्रॉ मध्ये वीज ग्राहकांनी महिन्याच्या अगोदर दरमहा 1 या प्रमाणे सलग 3 किंवा त्यापेक्षा वीज बिल अदा करलेले असावे.हे नियम अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in वर वीज ग्राहक संपर्क करून योजनेची माहिती घेऊ शकतात.